Video: पाहा समुद्राच्या मध्यभागी व्हेल खेळतोय या तरुणासोबत!

या व्हेल माशासोबत खेळणाऱ्या व्यक्तीने चाहत्यांना अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे.

Mumbai
Man plays Fetch with Beluga whale in delightful viral video. Do focus on the powerful message

सध्या सोशल मीडियावर एक व्यक्ती बेलुगा व्हेलसोबत खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओसोबत त्या व्यक्तीने खूप चांगला संदेश दिला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला दहा लाखांहून आधिकाधिक लोकांनी पाहिला आहे. स्टॅन्स ग्राऊंड या व्यक्तीने हा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. समुद्रातून मोटर बोटवरून प्रवास करत असताना या व्यक्तीने दूर बॉल पाण्यात फेकला आणि तो बॉल आणण्यासाठी चक्क व्हेल मासा गेला. त्यानंतर त्या व्हेलने तो बॉल आणूना त्या व्यक्तीला दिला.

या व्यक्तीने हा व्हिडिओ शेअर करताना असं चाहत्यांना विनंती केली आहे की, अशा प्राण्यांचा जीव वाचवा आणि प्लास्टिक वापरणे टाळा. समुद्रात टाकलेले प्लास्टिक हे समुद्रातील प्राण्यांना घातक असते.

या व्हिडिओ २० लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळले आहेत. तसंच हा शेअर करताना स्टॅन्स या युझरने महत्त्वाची माहिती देखील शेअर केली आहे. ९० टक्के प्लास्टिक पुनर्वापर होत नाही. तसंच प्लास्टिकचे विघटन होण्यास १०० वर्ष लागतात. प्लास्टिकमुळे पाणी दूषित होते आणि या पाण्यातील जीवांना देखील याचा धोका असतो. आम्हाला पर्यावरणास अनुकूल असं प्लास्टिकचा पर्याय उपलब्ध करून पाहिजे आहे, असं स्टॅन्स ग्राऊंड म्हणाला.

पाहा या व्हिडिओवर नेटकरी काय म्हणाले ते?


हेही वाचा – video: वाघिणीने तीन बछड्यांसह नदी किनारी लुटला पाणी पिण्याचा आनंद