घरट्रेंडिंगअॅपवर न्यूड फोटो; IRCTC ने दिले तक्रारदाराला जबरदस्त उत्तर

अॅपवर न्यूड फोटो; IRCTC ने दिले तक्रारदाराला जबरदस्त उत्तर

Subscribe

IRCTC चे उत्तर ऐकून तुमचे हसू आवरणार नाही...

काही लोक खूप जागरूक असतात. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीबद्दल ते सजग असतात. काही लोक त्याची तक्रार करतात. मात्र एखादी गोष्टी आपल्यावरच उलटू शकते, याची त्यांना पुसटशी कल्पनाही नसते. अशीच गत एका व्यक्तीची ट्विटरवर झाली आहे. IRCTC च्या अॅपवर न्यूड फोटो दिसतात. म्हणून त्याची तक्रार सदर व्यक्तीने ट्विटरवर केली. मात्र रेल्वेने दिलेल्या रिप्लायमुळे सदर व्यक्तीच तोंडघशी पडला असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

IRCTC च्या तिकीट बुकिंग अॅपवर महिलांचे न्यूड फोटो असलेल्या जाहीराती दिसतात, असी तक्रार एका नेटीझन्सने ट्विटरवर केली. या ट्विटमध्ये त्याने रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडल्सनाही टॅग केले होते. इंडियन रेल्वेज सेवा या ट्विटर हँडलने सदर ट्विटला उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की, “आयआरसीटीसीने गुगलचे ADX हे टूल ऑनलाईन जाहिराती दाखवण्यासाठी वापरले आहे. इंटरनेट वापरकर्ते ज्या ठिकाणी जाऊन सर्च करतात, त्याच्या कुकीजची हिस्ट्री ब्राऊजरमध्ये जनत झालेली असते. त्यानंतर सदर वापरकर्ता ज्या साईट्स किंवा अॅपवर जातो, तिथे तिथे त्याला त्याच जाहीराती दाखवल्या जातात. त्यामुळे अशा जाहिराती टाळायच्या असतील तर तुम्ही ब्राऊंजिंग हिस्ट्री क्लिअर करा, असा सल्ला आयआरसीटीसीने दिला”

रेल्वेच्या या रिप्लाय नंतर या तक्रारकर्त्याला ट्विटरवर चांगलेच ट्रोल केले जात आहे. काही लोकांनी सांगितले की, या एका ट्विटमुळे सदर व्यक्ती चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. तर काही लोकांनी त्याची खिल्ली उडवली आहे.

- Advertisement -

 

 

 

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -