Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग माघ मेळ्यात 'ट्रम्प' आणि 'हिटलर' करत आहेत देवाची उपासना

माघ मेळ्यात ‘ट्रम्प’ आणि ‘हिटलर’ करत आहेत देवाची उपासना

माघ मेळ्यात दाखल झालेल्या अनोख्या नावाच्या साधुंची बरीच चर्चा सुरू

Related Story

- Advertisement -

प्रयागराजमधील संगम शहरात सध्या एका माघ मेळ्यास सुरूवात झाली आहे. या मेळ्यात ऋषी महात्मा, साधूसंत मोठ्या संख्येने हजेरी लावतात. दरवर्षी याठिकाणी सर्व साधु-महात्मा लोकं देवाची पूजा करतात. परंतु यावेळी तेथे दाखल झालेल्या संतांच्या अद्वितीय अनोख्या नावामुळे हा मेळा चांगलाच चर्चेत आला आहे. असे पाहता संतांना कोणतीही जात, धर्म नसते. त्यांच्या गुरूंकडून त्यांना मिळालेले नाव म्हणजे त्यांची ओळख असते. यावेळी माघ मेळ्यात दाखल झालेल्या अशा अनोख्या साधुंच्या नावांची बरीच चर्चा सुरू आहे. या बाबांचं नाव ऐकून तुम्ही देखील आश्चर्यचकीत व्हाल हे नक्की. या दोन बाबांची नावं हिटलर बाबा, ट्रम्प बाबा असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिटलर बाबांना हे नाव त्यांच्या गुरूंनी दिले. त्यांच्या कामाने खुश होऊन एकदा त्यांना हिटलर या नावाने पुकारण्यात आले आणि तेव्हापासून ते हिटलर या नावाने प्रसिद्ध झाले. हिटलर बाबा म्हणतात की त्यांना कोणतेही काम मिळाले की ते विश्वासूपणे करतात आणि गुरूंच्या आदेशाचे पालन करतात. यामुळेच त्यांचे गुरू खूश झाले, आणि गुरुने त्यांना हे नाव दिले.

- Advertisement -

ट्रम्प यांचा अमेरिकेतील कार्यकाळ संपला असला तरी सध्या ट्रम्प यांचीच चर्चा प्रयागराजमध्ये सुरू आहे. प्रयागराजमधील या मेळ्यात हिटलर बाबांनंतर ट्रम्प बाबांच्या नवानेही सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रम्प बाबा त्यांच्या आश्रमाची संपूर्ण जबाबदारी उचलतात. ट्रम्प बाबांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्या गुरूने हे नाव दिले. मात्र ट्रम्प आहे तरी कोण? याबद्दल हे साधू बाबा अनभिज्ञच आहेत. याशिवाय, प्रयागराजमधील या माघ मेळ्यात सायलेंट बाबा, मारुती बाबा, गूगल बाबा, कंप्यूटर बाबा, पायलट बाबा हे देखील सध्या चर्चेत आहे. तर या बाबांना त्यांच्या नावाचा गर्व असून ते मिळणाऱ्या प्रसिद्धीबद्दल खूश आहेत.

- Advertisement -