Video : चक्क माकड काढतंय पोलिसाच्या डोक्यातल्या उवा!

उत्तर प्रदेशमधील एका पोलीस स्टेशनमध्ये माकड पोलीसाच्या खांद्यावर बसून उवा काढतं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

Mumbai
monkey sits on up cop shoulder looks for lice in his hair viral video leaves internet in splits
Video : चक्क माकड काढतंय पोलीसाच्या डोक्यातल्या उवा!

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशमधील एक व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. चक्क या व्हिडिओमध्ये माकड पोलीस अधिकाऱ्याच्या डोक्यातल्या उवा शोधण्याचा प्रयत्न करत आहे. उत्तर प्रदेशमधील अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल श्रीवास्तव यांनी हा व्हिडिओ टि्वटरवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उत्तर प्रदेशमधील पीलीभीत जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये एक पोलीस अधिकारी काम करत असताना दिसत आहे. तर माकड त्या पोलीस अधिकाऱ्याच्या खांद्यावर बसून डोक्यातल्या उवा शोधण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. दोघे स्वतःच्या कामात व्यग्र असल्याचे दिसत आहे.

हा व्हिडिओ टि्वटरवर शेअर करताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल श्रीवास्तव यांनी असं लिहिलं आहे की, ‘पीलीभीतच्या या पोलीस अधिकारी सरांचा अनुभव असा सूचित करतो की, जर तुम्हाला कामात अडथळा आणण्याची इच्छा नसेल तर रिठा, शिकेकाई किंवा चांगले शैम्पू वापरा!’

नक्की पहाया’ अभिनेत्रीचा हॉट आणि सेक्सी लूक पाहाच

हा व्हिडिओ १६ हजारहून अधिक जणांनी पाहिला आहे. तर १४ हजारपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे. एका युझरने अशी प्रतिक्रिया दिली की, ‘सर स्वतःच काम करीत आहे आणि माकड खांद्यावर बसून स्वतःचे काम करत आहे.’ पहा युझरने दिलेल्या प्रतिक्रिया….

हेही वाचा चक्क गायीने पाळले वाहतुकीचे नियम; पहा ‘हा’ व्हिडिओ

जेव्हा माकड अधिकाऱ्याच्या डोक्यावर बसतं

जेव्हा माकड अधिकाऱ्याच्या डोक्यावर बसतं

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 9, 2019