Viral Video: स्कूटरला टक्कर दिल्याच्या क्षुल्लक कारणावरुन केली मरेपर्यंत मारहाण

MP horror: Auto driver brutally assaulted in Jabalpur over road rage; video goes viral
Viral Video: स्कूटरला टक्कर दिल्याच्या क्षुल्लक कारणावरुन केली मरेपर्यंत मारहाण

सध्या सोशल मीडियावर मध्य प्रदेशमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुमच्या अंगावर शहारा येईल. एका ऑटोची स्कूटरसोबत टक्कर दिल्याच्या क्षुल्लक कारणावरुन ऑटो चालकाला मरेपर्यंत मारहाण केली आहे. अक्षरशः केस पकडून त्याला फरफटत मारहाण केली आहे. एका युवकाने यावेळी वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला धमकवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान खूप लोकांची गर्दी झाली होती, पण या मारहाणीत कोणीच मधे पडले नाही. पण लोकांनी या घटनेचा व्हिडिओ करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडिओच्या आधारे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. स्वतः एसपीने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

नक्की काय घडले?

चांदमारी तलैया टेस्टिंग रोडवरील रहिवाशी अजित विश्वकर्मा (वय २३) हा ऑटो चालक आहे. रविवारी संध्याकाळी ४.१५ वाजता कंजनपुर बमबम किराणा जवळ लोहच्या सेंट्रिंग प्लेट लोड करून लालमाटीच्या घरी जात होता. त्यावेळेस शोभापुर ब्रिजच्या खाली साइड रोडवर त्यांची स्कूटरशी टक्क झाली. त्यामुळे दोन तरुणी पडल्या. त्याचवेळेस मागून लाल रंगाची गाडीवाला अभिषेक उर्फ गुडडीदुबे आणि चंदन सिंह नावाचे दोन तरुण तिथे पोहोचले. दोघांनी अजितला बेदम मारहाण केली. त्यावेळेस चालकाच्या ओळखीच्या राजा ठाकूर आणि सचिन शर्माने मधे येऊन त्याचा बचाव केला, तर मारहाण करणारे व्यक्ती धमकी देऊन तिथून निघून गेले.

स्कुटी चालवणाऱ्या तरुणीच्या तक्रारीवरून रविवारी पोलिसांनी ऑटो चालकाविरोधात भादंवि कलम ३३७, २२९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसपीच्या निर्देशवर सोमवारी पोलिसांनी चालकाच्या तक्रारवरून आरोपी अभिषेक उर्फ गुडी दुबे आणि चंदन सिंह विरोधात भादंवि कलम २९४, ३२३, ३०७, ५०६, ३४ अतंर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पाहा व्हिडिओ

#MadhyaPradesh An auto driver being hit brutally.. 😡😡😡Sad that people have become mute spectators

Posted by Nikhil Reddy Gudur on Monday, October 12, 2020


हेही वाचा – चोरीनंतर चोरानं ठेवली चिठ्ठी; वाचून तुम्हीही म्हणाल, मार दिया जाय या छोड दिया जाय!