घरट्रेंडिंगAmazon चे पार्सल हरविल्यानंतर मुंबईकर तरुणाची थेट जेफ बेझोसकडे तक्रार

Amazon चे पार्सल हरविल्यानंतर मुंबईकर तरुणाची थेट जेफ बेझोसकडे तक्रार

Subscribe

ऑनलाईन शॉपिंग साईट्सचे सध्या डिस्काऊंटचे दिवस सुरु आहेत. दसरा आणि दिवाळीचे मुहुर्त साधून ई कॉमर्स साईट्स दरवर्षी आपला स्टॉक क्लिअर करण्यासाठी भरघोस सुट देण्यासाठी काही ठराविक दिवस सेल ठेवत असतात. मात्र ऑनलाईन शॉपिंग करताना कधी कधी फसवणुकीचा सामना करावा लागतो. असाच एक प्रकार मुंबईकर तरुणासोबत घडला आहे. या तरुणाने Amazon वरुन एक फोन विकत घेतला होता. मात्र तो त्याला न मिळता मधूनच चोरी झाला. त्यानंतर संतापलेल्या या मुलाने थेट Amazon चे CEO जेफ बोझेस यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रार केली. आश्चर्याची बाब म्हणजे जगातील टॉप ५ श्रीमंत व्यक्तीमध्ये समावेश असलेल्या जेफ यांनी हा ईमेल वाचून मुंबईकर तरुणाची समस्याही सोडवली.

मुंबईतील ओमकार हणमंते या तरुणाने आपल्या आजीसाठी Amazon साईटवरुन एक मोबाईल ऑर्डर केला होता. हा फोन त्याच्यापर्यंत डिलिव्हर झालाच नाही. मात्र ऑनलाईन साईटवर फोन डिलिव्हर झाल्याचे दाखविण्यात आले होते. त्यानंतर संतापलेल्या ओमकारने थेट कंपनीच्या मालकालाच एक सणसणीत ईमेल ठोकला. विशेष म्हणजे जेफ यांनी त्याच दिवशी हा ईमेल वाचून Amazon च्या टीमला ओमकारची अडचण तात्काळ सोडविण्याचे आदेश दिले. या पत्राचा थोडक्यातला अंश पुढीलप्रमाणे आहे.

- Advertisement -

हाय जेफ,

“आशा करतो तुमचं सगळं चागलं सुरु आहे.

- Advertisement -

मी तुमच्या ग्राहक सेवा आणि वितरण व्यवस्थेबद्दल कमालीचा निराश झालो आहे. मी Amazon वरुन एक मोबाईल ऑर्डर केला होता. मात्र तो माझ्यापर्यंत न देता. सोसायटीच्या गेटवर ठेवण्यात आला. तिथून तो चोरी झाला. मला या डिलिव्हरीबद्दल कोणता फोनही आला नाही.

विशेष म्हणजे मी आपल्या ग्राहक सहाय्यता क्रमांकावर फोन केला. ‘तपास सुरु आहे’, असे एकच उत्तर पलीकडून मला देण्यात येत आहे. मी आपल्याला फोन चोरी झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील पाठवत आहे. एकूणच हा सर्व प्रकार मनस्ताप देणारा आहे. आता पुन्हा Amazon वरुन काही विकत घेण्याआधी मला विचार करावा लागेल.”

ओमकारच्या ईमेलनंतर जेफ यांनी भारतातील व्यवस्थापकांना या तक्रारीचा पाठपुरावा करण्यास सांगितले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील Amazon चा डिलिव्हरी बॉय गेटवरच पार्सल ठेवून गेल्याचे दिसत होते. त्यानंतर ओमकारला नवीन फोन देण्यात आला. यावेळी डिलिव्हरी थेट त्याच्या हातात देण्यात आली.


 

Video: मनसेनं करुन दाखवलं, Amazon App आता मराठी भाषेत, जेफ बेझोसनी घेतली दखल

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -