साराने केली लिप सर्जरी; सोशल मीडियावर ट्रोल

अभिनेत्री सारा खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने आपल्या लिपची सर्जरी केल्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

Mumbai
mumbai sara khan get troll After lip surgery
सारा खाना पुन्हा एकदा चर्चेत

सध्याच्या अभिनेत्री सुंदर आणि आकर्षित दिसण्यासाठी वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करत असतात. मग त्यामध्ये ओठाचा आकार बदलणे, चेहर्‍यावरील व्रण घालवणे, तीळ काढणे, हनुवटीचा आकार बदलणे यासारख्या अनेक शस्त्रक्रिया करण्यासाठी सातत्याने प्लास्टिक सर्जरी करतात. आता यात एका अभिनेत्रीने देखील उडी घेतली आहे ती म्हणजे अभिनेत्री सारा खाना. सारा खान सध्या चर्चेत असून या अभिनेत्रीने लिपची सर्जरी केली असून ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे.

‘सपना बाबुल का – बिदाई’ या टीव्ही मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सारा खान पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. पण ही चर्चा तिच्या नव्या शो बद्दल नसून तिच्या लिप सर्जरीबद्दल आहे. सारा खानने नुकतीच ओठांची सर्जरी केली आहे. मात्र तिला ते ओठ शोभत नसल्याने तिला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे. पण यावर तिने लिप सर्जरी बरोबर झाली असून ती मला शोभत असल्याचं उत्तर देत साराने नेटकऱ्यांना गप्प केले आहे.

बोल्ड फोटो पोस्ट

सारा खान सोशल मीडियीवर नेहमीच सक्रीय असते. यामुळे तिच्या प्रत्येक फोटो आणि पोस्टवर नेटकऱ्यांचे लक्ष असतं. काही दिवसांपूर्वीच तिने तिचे काही बोल्ड फोटो पोस्ट केले होते. त्याबरोबर तिचा नवीन अल्बम येत असल्याचेही तिने सांगितले होते. पण त्या अल्बममधील गाण्यापेक्षा चर्चा झाली ती म्हणजे साराच्या चेहऱ्याची आणि ओठांची. कारण यात तिने ओठांची शस्त्रक्रिया केलेले स्पष्ट दिसत होते. पण ओठांची शस्त्रक्रिया केल्यानंतर सारा चांगली दिसण्याऐवजी विचित्र दिसत आहे. यामुळे तिला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. मात्र तिने न चिडता न रागवता आपल्या स्टाईलमध्ये त्यांना उत्तर दिले आहे. ती म्हणाली माझील लिप सर्जरी व्यवस्थित झाली असून माझा चेहरा बघून मी तर फारच खुश आहे. तसेच मी लिप फ्रिलरचा उपयोग करते. त्यामुळे ती सर्जरी नसल्याचे तिने सांगितले आहे.


वाचा – ‘पँट विसरली’ म्हणत काजोलची मुलगी ट्रोल


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here