घरट्रेंडिंगनीलाकुरिंजी फुलांनी फुलते १२ वर्षांनी 'येथे' बाग

नीलाकुरिंजी फुलांनी फुलते १२ वर्षांनी ‘येथे’ बाग

Subscribe

केरळच्या मुन्नारच्या एराविकुलम नॅशनल पार्कमध्ये लवकरच नीलाकुरिंजी फुलांची बाग फुलण्याच्या तयारीत आहे, तीसुद्धा १२ वर्षांनी.

एखादं फूल १२ वर्षांनी फुलतं असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना? तुम्हाला माहीत आहे का असं कोणतं फूल? पण हो असं फुल आहे आणि तेसुद्धा भारतामध्ये. केरळच्या मुन्नारच्या एराविकुलम नॅशनल पार्कमध्ये लवकरच अशा फुलांची बाग फुलण्याच्या तयारीत आहे, तीसुद्धा १२ वर्षांनी. या फुलांचं नाव आहे नीलाकुरुंजी. संपूर्ण पठारावर याच फुलांनी भरलेली ही बाग बघण्यात एक वेगळीच मजा आहे. हे सौंदर्य बघण्यासाठी अनेक पर्यटक इथं पोहचतात. चारही बाजूनं गडद निळ्याशार रंगांची फुलं. या फुलांचा अगदी औषधांसाठीदेखील उपयोग करण्यात येतो. ही फुलं केवळ देखाव्याची नसून याचे गुणधर्मदेखील खूप आहेत.

- Advertisement -

काय आहे नीलाकुरिंजी फूल?

नावावरूनच हे फूल नीळं असणार याची कल्पना येते. हे फुल साधारण १२ वर्षांनी उगवतं. यावर्षी हे फूल उगवणार आहे. हे फूल ब्राईट ब्ल्यू रंगाचं असून जेव्हा फुलतं तेव्हा संपूर्ण पठाराचा रंग निळाशार होतो. जुलै महिन्याच्या शेवटी ही फुलं फुलायला सुरुवात होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निळ्याशार रंगामुळंचं कुन्नूरचं नाव ‘निलगिरी’ असं झालं. मुन्नारमध्ये आढळणारी ही नीलाकुरिंजीची फुलं अतिशय दुर्मिळ आहेत. साधारण जुलै महिन्याच्या शेवटापासून ते ऑक्टोबरपर्यंत ही फुलं पाहता येतात. कुन्नूर, कोडाईकनाल, मुन्नार इत्यादी पठारांवर ही फुलं फुललेली दिसतात. २००६ मध्ये ही फुलं कोडाईकनालमध्ये फुलली होती. त्यानंतर २०१२ मध्ये कुन्नूरमध्ये या फुलांचा आनंद घेता आला होता. तर आता २०१८ मध्ये मुन्नारमध्ये ही फुलं फुलत आहेत.

- Advertisement -

कुठे पाहता येतील ही फुलं?

कोचीपासून पाच तासांच्या अंतरावर असणाऱ्या कोवीलूर, राजमाला आणि एराविकुलम नॅशनल पार्कमध्ये ही फुललेली फुलं पर्यटकांना पाहता येतील. भारतीय पर्यटकांसाठी १२० रुपये शुल्क आकारण्यात येणार असून विदेशी पर्यटकांसाठी ४०० रुपये शुल्क आकारण्यात येईल. तर लहान मुलांसाठी हे शुल्क ९० रुपये असणार आहे. तिकिट्सची नोंदणी करण्याकरिता पर्यटक www.munnarwildlife.com अथवा www.eravikulamnationalpark.com या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -