Video : मुस्लिम व्यक्तीने बायकोला कसं मारावं? प्रशिक्षणाचा व्हिडिओ व्हायरल

New Delhi
muslim men teaches how to beat women correctly
कतार मधील समाजसास्त्रज्ञाचा व्हिडिओ व्हायरल

कतार मधील एका समाजशास्त्रज्ञाची सध्या इंटरनेटवर चांगलीच चर्चा होत आहे. या व्यक्तीने युट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केलाय. ज्यामध्ये त्याने मुस्लिमांनी आपल्या पत्नीला कसे मारावे, याबद्दलचे प्रशिक्षण दिले आहे. कतार मधील समाजशास्त्रज्ञ अब्द अल अझीज अल-खझराज यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये मुस्लिम व्यक्तिने घराचे नेतृत्व कसे करावे आणि बायकोला शिस्त कशी लावावी याबद्दलचे प्रशिक्षण दिले आहे.

हा बघा व्हिडिओ –

या व्हिडिओची सुरुवात झाल्यावर अल-खझराज सांगतात की, प्रेक्षकांनो आणि विशेषतः ज्यांचे लग्न झालेत अशा प्रेक्षकांनो तुम्हाला हे माहीत असावं की बायकोला कसं मारतात. बायकोला मारणं गरजेचं आहे का? प्रत्येक नवऱ्याने त्याच्या बायकोला रोज मारलं पाहीजे? नाही का. अल-खझराज पुढे सांगतात की, बायकोला हळुवारपणे मारलं पाहीजे. नवऱ्याने बायकोला तिचे स्त्रीत्व जाणवून द्यावे आणि स्वतःचा मर्दपणाही दाखवावा.

या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगीही दिसत आहे. जो अल-खझराज यांना त्यांचा विषय समजावून सांगण्यात मदत करत आहे. अल-खझराज हे त्या लहान मुलाला हळुवारपणे खांद्यावर चापटवत असून बायकोला कसे मारतात? याचे प्रात्यक्षिक दाखवले आहे. तुम्ही पुर्ण व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्हाला या व्हिडिओ मधील खरे सत्य कळेल. खरंतर अल खझराज यांना एक वेगळाच मुद्दा सांगायचा आहे. “प्रेषित मुहम्मद यांनी इस्लाम धर्म क्षमाशिल असल्याचे सांगितले आहे. प्रेषितांनी पत्नीच्या चेहरा आणि डोक्यावर मारण्यास मनाई केली आहे. कानाखाली आवाज काढणे, डोक्यात घालणे, नाक फोडणे अशा प्रकारच्या कृतींना इस्लामने आळा घातला आहे. मारहाण ही इस्लामच्या शिस्तीत बसत नाही.”

अल-खझराज यांनी उपरोधिकपणे एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या व्हिडिओला आतापर्यंत पाच लाख व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र काही लोकांनी अल-खझराज यांच्यावर टीकात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here