घरट्रेंडिंग'या' व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतेय भारताची खरी प्रतिमा!

‘या’ व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतेय भारताची खरी प्रतिमा!

Subscribe

अशा प्रकारचं दृश्य भारतात अगदी सहज कुठेही दिसून येऊ शकतं. आजही देशात अनेक भागांमध्ये हिंदू-मुस्लिम किंवा इतर धर्मीयही गुण्या-गोविंदाने राहात आहेत. त्यांच्यात सौहार्दपूर्णच नाहीत, तर घरोब्याचे संबंधही आहेत. पण चर्चा मात्र धार्मिक तेढ आणि तणावाच्या गोष्टींची जास्त होते. मात्र, या अशा घटनांमुळे भारताची पुन्हा तीच सौहार्दपूर्ण प्रतिमा जगासमोर येते.

जातीय, धार्मिक दंगलींच्या, वादाच्या किंवा प्रसंगी हिंसेच्याही अनेक घटना घडल्याचं आपण ऐकत असतो. त्यातून देशाची एक विशिष्ट प्रकारची प्रतिमा तयार होऊ लागली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे देशांतर्गत ही प्रतिमा तयार होते आहेच, मात्र परदेशातही अशाच प्रकारची प्रतिमा तयार होताना दिसते. आणि त्यातूनच वातावरण पुन्हा कलुषित होऊन तणावपूर्ण बनतं. पण एकीकडे देशात धार्मिक किंवा जातीय तेढ असण्यासोबतच अशाही अनेक घटना घडतात, ज्या देशाची सर्वधर्म समभाव आणि सौहार्दाची प्रतिमा जगासमोर आणतात. अशीच एक घटना पंजाबमध्ये घडली आहे, जिनं भारत एक विभिन्न जातीधर्मांचा सौहार्दपूर्ण देश असल्याचं जगासमोर ठेवलं आहे. नेटिझन्समध्ये या व्हिडिओची भलतीच क्रेझ निर्माण झाली असून अवघ्या काही वेळात त्याला ८५ हजार व्यूज मिळाले आहेत!

गुरुद्वारामध्ये नमाज पठण!

ही घटना सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमधून समोर येत आहे. हा व्हिडिओ पंजाबमधील असल्याचं दिसत आहे. एका गुरुद्वारामधलाच व्हिडिओ असल्याचं तो ट्विटरवर पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. त्यामध्ये पंजाबी भाषेमध्ये आध्यात्मिक व्याख्यान सुरू आहे. मात्र त्याचवेळी त्याच हॉलमध्ये इतर शीख बांधव स्टेजवरच्या व्यक्तीचं प्रवचन ऐकत असताना बाजूलाच एक मुस्लिम व्यक्ती नमाज पठण करताना दिसत आहे.

- Advertisement -

आम्ही भारतीय ‘असे’ही आहोत..!

वास्तविक अशा प्रकारचं दृश्य भारतात अगदी सहज कुठेही दिसून येऊ शकतं. आजही देशात अनेक भागांमध्ये हिंदू-मुस्लिम किंवा इतर धर्मीयही गुण्या-गोविंदाने राहात आहेत. त्यांच्यात सौहार्दपूर्णच नाहीत, तर घरोब्याचे संबंधही आहेत. पण चर्चा मात्र धार्मिक तेढ आणि तणावाच्या गोष्टींची जास्त होते. मात्र, या अशा घटनांमुळे भारताची पुन्हा तीच सौहार्दपूर्ण प्रतिमा जगासमोर येते.

या व्हिडिओमध्ये ही मुस्लिम व्यक्ती नमाज पठण करताना दिसत आहे. मात्र, तिच्यावर कोणतीही शीख धर्मीय व्यक्ती आक्षेप घेताना दिसत नाही. त्यामुळेच हा व्हिडिओ नेटिझन्समध्येही चर्चेचा विषय ठरत असून तशाच पद्धतीने तो व्हायरलही होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -