घरट्रेंडिंगराष्ट्रवादीच्या बैठकीत फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईन' डायलॉगची चर्चा

राष्ट्रवादीच्या बैठकीत फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ डायलॉगची चर्चा

Subscribe

महाराष्ट्रात भाजप सोडून इतर पक्ष एकत्र येत सरकार स्थापन्याचा प्रयत्न करत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या आधीपासून ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असे घसा खरवडून सांगितले होते. मात्र शिवसेनेबरोबर सत्ता स्थापनेचे मनसुबे निष्फळ ठरल्यानंतर आता फडणवीसांच्या या डायलॉगने सगळीकडे चांगलेच धुमशान घातले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देखील शरद पवारांसमोरच इतर नेत्यांनी या डायलॉगची चवीचवीने चर्चा केली.

राष्ट्रवादीच्या बैठकीत 'मी पुन्हा येईन' डायलॉगची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या 'मी पुन्हा येईन' डायलॉगवर महत्त्वपूर्ण चर्चा | एकदा ऐकाच…

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ನವೆಂಬರ್ 17, 2019

- Advertisement -

बैठकी दरम्यान छगन भुजबळ यांनी “पाऊस गेला ते बरं झालं, जाताना देवेंद्रलाही घेऊन गेला, हेही बरं झालं” असे वाक्य उच्चारले. त्यानंतर फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या डायलॉगची खमंग चर्चा सुरु झाली. जितेंद्र आव्हाड यांनी टिक टॉकवर कशापद्धतीने मी पुन्हा येईनचे व्हिडिओ बनत आहेत, याची माहिती दिली. त्यानंतर मुंडे यांनी भाऊ कदम यांच्या डायलॉगची कशी सरमिसळ करून व्हिडिओ तयार केले जात आहे, याची माहिती दिली. ही सर्व चर्चा सुरु असताना शरद पवारही त्याला हसून दाद देत होते.

पुण्यातील मोदी बाग या शरद पवारांच्या निवासस्थानी आज कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, मकरंद पाटील, नवाब मलिक, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ उपस्थित होते. उद्यापासून लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. तसेच शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने किमान समान कार्यक्रम ठरवलेला आहे. यावर अधिक चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलविण्यात आली होती.

- Advertisement -

बघा देवेंद्र फडणवीस यांच्यावरील मिम्स

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -