घरट्रेंडिंगफिटनेस चॅलेंजची सोशल मीडीयावर नेटीझन्सनी उडवली टर

फिटनेस चॅलेंजची सोशल मीडीयावर नेटीझन्सनी उडवली टर

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचार पण केला नसेल की, फिटनेस चॅलेंज स्वीकारणे हे त्यांच्यासाठी एक मोठे चॅलेंज ठरेल. विराट कोहलीचे फिटनेस चॅलेंज स्वीकारल्यावर सोशल मीडियावर सर्वच स्तरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सगळेच चॅलेंज देऊ लागले आहेत.

सुरुवातीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरून मोदीना चॅलेंज दिले “प्रिय पंतप्रधान, तुम्ही विराट कोहलीचे फिटनेस चॅलेंज स्वीकारण्याची उत्सुकता दाखवलीत. तर इथे माझ्याकडून मी तुम्हाला एक चॅलेंज देत आहे. इंधनाच्या किंमती कमी करा नाहीतर कॉंग्रेस देशभर आंदोलन करेल आणि आपल्याला इंधनाच्या किंमती कमी करण्यास भाग पाडेल. मी तुमच्या प्रतिसादाची अपेक्षा करतो. ”

- Advertisement -

 

- Advertisement -

 

यावर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी ट्विट केले की, विराट कोहलीच्या फिटनेस चॅलेंजल स्वीकारण्यात काही गैर नाही. पण मी देखील तुम्हाला काही चॅलेज देतो. ‘तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्या, शेतकऱ्यांना दिलासा द्या, दलित आणि अल्पसंख्यांकाविरूद्ध हिंसाचार होणार नाही याची काळजी घ्या .’ हे चॅलेंज मी तुम्हाला देतो. नरेंद्र मोदी तुम्ही माझं हे आव्हान स्वीकाराल का ?

While we have nothing against accepting fitness challenge from @imVkohli . I urge you to accept the challenge to provide jobs to young, relief to farmers, promise of no violence against dalits & minorities. Would you accept my challenge @narendramodi Sir?

— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) May 24, 2018

हे इतक्यावरच थांबलेनाही कॉंग्रेसचे नेते संजय झा यांनी पंतप्रधान मोदी यांना “#DegreeFitHaiChallenge” दिले आहे.

त्याचप्रमाणे सोशल साईटसवर नेटीझन्सनी देखील काही मज्जेशीर ट्विट करत फिटनेस चॅलेज दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -