घरट्रेंडिंग'संजू'मुळे राज-उद्धव ट्रोल

‘संजू’मुळे राज-उद्धव ट्रोल

Subscribe

संजू चित्रपट सध्या चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकुळ घालत आहे, त्याचबरोबर चित्रपटातील डायलॉग्जदेखील सोशल मीडियावर सर्वांचे मनोरंजन करत आहेत. संजूच्या डायलॉग्जवरुन विविध प्रकारचे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या मिम्सद्वारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनदेखील ट्रोल केले जात आहे.

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारीत असलेला आणि रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित ‘संजू’ चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान घोडदौड करतोय, सोशल मीडियावरदेखील या चित्रपटाचीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट समीक्षकांसह प्रेक्षकांचीही मने जिंकत आहे. या चित्रपटाचे अनेक डायलॉग सध्या सोशल मीडियावर गाजत आहेत, तर काही डायलॉग्जचे मिम्स सोशल मीडियावर सर्वांच्या पसंतीस उतरले आहेत. संजू चित्रपटात ‘वो बाहर कॅज्युल्टी में कोई मरने की हालत में रहा, तो उसको फॉर्म भरना जरुरी है क्या?’ या डायलॉगवरुन सध्या तुफान जोक्स होत आहेत. प्रत्येक गोष्टीवर या डायलॉगच्या ढंगात मिश्किल विनोद केले जात आहेत. असेच काहीसे विनोद राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील केले जात आहेत.

राज ठाकरेंना हवी एकहाती सत्ता

२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेकडे एकहाती सत्ता देण्याचे आवाहन केले होते. परंतु या निवडणुकीमध्ये मनसेचा केवळ एकच आमदार निवडून आला. राज्यात एखाद्या पक्षाला एकहाती सत्ता मिळवण्यासाठी २८८ पैकी १४५ आमदार निवडुन येणे गरजेचे असते. परंतु १४५ ऐवजी केवळ एकच आमदार निवडून आल्यामुळे मनसे पक्ष आणि राज ठाकरे यांना सोशल मीडियावर ट्रोल केले. आता पुन्हा संजूच्या निमित्ताने राज यांना ट्रोल केले जात आहे.

- Advertisement -

प्लास्टिकबंदीवरुन जोक्स

राज यांच्यावर तयार करण्यात आलेल्या मिम्समध्ये राज ठाकरे ‘ते एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी आमदार निवडून येणे गरजेचे आहे का?’ असा सवाल विचारताना दिसत आहेत तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनादेखील ट्रोल केले जात आहे. उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांना अनेकदा ‘सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. तसेच शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी ‘आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो’, असे माध्यमांसमोर वक्तव्यं केले होते. परंतु प्रत्यक्षात ४ वर्षात शिवसेनेच्या एकाही मंत्र्याने कधीच राजीनामा दिला नाही. शिवाय पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज्यात प्लास्टिकवर बंदी घातली आहे. रामदास कदम हे शिवसेनेचे आमदार आहेत त्यामुळे उद्धव यांना ट्रोल केले जात आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -