Video: जगातील शेवटच्या तस्मानियन वाघाचा एक दुर्मिळ व्हिडिओ व्हायरल!

New Delhi
nfsa released video of last known tasmanian tiger see rare viral footage
Video: जगातील शेवटच्या तस्मानियन वाघाचा एक दुर्मिळ व्हिडिओ व्हायरल!

नॅशनल फिल्म अँड साउंड आर्काइव्ह ऑफ ऑस्ट्रेलियाच्या वतीने पृथ्वीवरील शेवटच्या तस्मानियन वाघाचा व्हिडिओ ट्विटद्वारे शेअर केला आहे. आता ही वाघाची प्रजाती नामशेष झाली आहे. हे वाघ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात. हे त्याच्या शरिरावरील विशिष्ट पट्ट्यासाठी तस्मानियन वाघाला ओळखले जाते.

हा व्हिडिओ १९३५ मध्ये चित्रित करण्यात आला होता. या तस्मानियन वाघाचे बेंजामिन असे नाव होते. एका प्रसिद्धी पत्रकानुसार हा वाघ हॉबर्टच्या प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात आला होता. त्याच वेळी, दुसरा वाघ लंडन प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आला होता. या दोन ठिकाणी या प्रजातीचे वाघ ठेवण्यात आले होते. पण एकाला गोळ्या झाडून मारले होते.

बेंजामिन हा वाघ ८५ वर्षांपूर्वी भेटला होता. बेंजामिन यांचा मृत्यू होण्यापूर्वी त्याचा हा व्हिडिओ केला होता. २१ सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ७ डिसेंबरला हा व्हिडिओ शूट केल्यानंतर एका वर्षाने तस्मानियन वाघचा मृत्यू झाला. जगातील हा एकमेव तस्मानियन वाघ असल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे.

या व्हिडिओ एका दिवसापूर्वी शेअर केला गेला आहे. आतापर्यंत ९४ हजारहून अधिक व्हयूज मिळाले आहेत. ऑस्ट्रेलियन संग्रहालयाच्या म्हणण्यानुसार, तस्मानियन वाघ एकेकाळी महाद्वीपीय ऑस्ट्रेलियामध्ये राहत होता. परंतु सुमारे २००० वर्षांपूर्वी मुख्य भूमीवरून या वाघाची प्रजाती नामशेष झाली.


हेही वाचा – बायकोच्या प्रियकराला संपवण्याचा रचला कट; कोरोना लसीच्या बहाण्याने पाजले विष!