आता तुम्ही राहू शकता एवेंजर्स आणि हॅरी पॉटरच्या घरात; मोजा इतकी किंमत

हे जादूचे घर साधारण १४ व्या शतकातील असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी या घरात दोन बेडरूम, एक डायनिंग रूम, एक गार्डन आणि वाचनासाठी एक खोली देखील उपलब्ध

Mumbai

घर फक्त छप्पर आणि चार भिंतीचे नसते तर काही घरे इतिहास, वारसा आणि आठवणींनी परिपूर्ण असतात, ज्यामुळे त्यांना अनन्य साधारण महत्व प्राप्त होते. यामुळे असे काही घरं आपल्यासाठी खास ठरतात. जरी अशा घरात आपण राहत नसलो तरी आपले आवडीचे काही काल्पनिक पात्र त्या घरात वास्तव्य करत असतील तर ते आपल्यासाठी स्पेशलच ठरते. जसे की, ‘एवेंजर्स: एंडगेम्स’ मधील लेकसाइड केबिन ज्यामध्ये चित्रपटाचा आयर्न मॅन (टोनी स्टार्क) त्याची पत्नी पेप्पर आणि मुलगी मॉर्गन सोबत राहत असतो.

पॉटरहेड्स असेच एक घर आहे. या नावाच्या घराशी फारसे कदाचित परिचित असतील, परंतु हे तेच घर आहे त्या घरात लिली आणि जेम्स पॉटर गॉड्रिक काल्पनिक शहरात राहत होते. इंग्लंडच्या लावेनहम गावात राहत असलेले डी वेरी नावाचे हे घर आता भाड्याने घेता येणार आहे. त्याची किंमत फक्त १० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र, हे १० हजार रूपये भाडं महिन्याभराचे नाहीतर या घरात एका रात्रीसाठी राहण्याकरता ही किंमत आहे. याच घरात हॅरी पॉटर या चित्रपटाची देखील शुटिंग झाली होती. त्या घराचेच हे काही फोटो…

यू एस टूडेनुसार, हे जादूचे घर साधारण १४ व्या शतकातील असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी या घरात दोन बेडरूम, एक डायनिंग रूम, एक गार्डन आणि वाचनासाठी एक खोली देखील उपलब्ध आहे. तसेच द इंडिपेंडेंटच्या अहवालानुसार हे घर दोन व्यक्ती देखील भाड्याने घेऊ शकतात.


…आणि बघितले तर दिसली लांब-लचक मगर