वाह रे माणुसकी! कपलनं लग्नानंतर ५०० कुत्र्यांना जेवू घातलं

odisha couple got married arranged meal for 500 stray dogs in bhubaneswar
वाह रे माणुसकी! कपलनं लग्नानंतर ५०० कुत्र्यांना जेवू घातलं

सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे लग्न समारंभ हा साध्या पद्धतीने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उरकला जात आहे. यादरम्यान अनेक जोडपी कौतुकास्पद काम करत आहेत. असंच कौतुकास्पद काम ओडिशा येथील भुवनेश्वरमधील जोडप्यानं केलं आहे. त्यांनी केलेल्या कामातून माणूसकीचं दर्शन झालं आहे. या जोडप्यानं मंदिरात लग्न उरकून ५०० कुत्र्यांना जेवू घातलं आहे. सध्या या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

युरेका आप्टा आणि जोना असं या जोडप्याचं नाव आहे. २५ सप्टेंबरला या ओडिशाच्या भुवनेश्वरमधील राहणारी युरेका आप्टा हिने जोना यांच्यासोबत लग्न केलं. त्यावेळेस Animal वेलफेअर ट्रस्ट्र एकमराच्या (AWTE) स्वयंसेवकांच्या वतीने भटक्या कुत्र्यांना त्यांनी जेवू घातलं.

एनडीटीव्ही वृत्तानुसार, युरेका आप्टा ही चित्रपट निर्माती आहे. तर जोना वांग दंतचिकित्सक आहे. या दोघांमिळून लग्नाच्या दिवशी ५०० पेक्षा जास्त भटक्या कुत्र्यांना खायला देण्यासाठी त्यांनी स्थानिक प्राणी बचाव संस्थेशी करार केला होता. त्यांनी स्थानिक मंदिरात साध्या पद्धतीनं लग्न केलं. त्यानंतर दोघांनीही ५०० कुत्र्यांना जेवू घातलं. यादरम्यान काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माहितीनुसार, या जोडप्याला प्राण्यांची खूप आवड आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी एका कुत्र्याचे प्राण वाचवले होते. तो कुत्रा एका अपघातमध्ये जखमी झाला होता. या कुत्र्याचा आश्रयस्थानाच्या शोधादरम्यान त्यांना एकमारा स्वयंसेवी संस्थेची माहिती मिळाली.


हेही वाचा – जनसेवा करण्यासाठी १४ दिवसांच्या नवजात बाळासह IAS Officer कार्यालयात रुजू