BSF जवानाने विमानातील सहप्रवाशाचे वाचवले प्राण

सहप्रवासी असणाऱ्या व्यक्तीला ह्रदयविकाराचा झटका आल्याने प्रसंगवधान दाखवत BSF जवानाने वाचवले प्राण

Mumbai

भारतीय लष्कराचा अभिमान वाटावा अशी एक घटना नुकतीच समोर आली आहे. भारतीय जवान हे नेहमी कोणाच्याही मदतीस धाऊन जाण्यास तत्पर असतात. विमानप्रवास करत असताना विमानातील सहप्रवाशाला अचानक छातीत वेदना होऊ लागल्या, त्यानंतर त्या व्यक्तीला ह्रदयविकाराचा झटका आल्याचे समजले. मात्र, या व्यक्तीच्या बाजूलाच सीमा सुरक्षा दलातील म्हणजेच BSFचा एक जवान बसला होता.

सहप्रवासी असणाऱ्या व्यक्तीला ह्रदयविकाराचा झटका आल्याने प्रसंगवधान दाखवत BSF जवानाने सहप्रवाशाची मदत करत त्याचा जीव वाचवला. या घडलेल्या घटनेबद्दल बीएसएफने आपल्या अधिकृत खात्यावरून ट्विट करून माहिती दिली आहे.

बीएसएफने हे ट्विट करत असे म्हटले की, एक प्रहरी कधीच सुट्टीवर नसतो. तसेच त्या जवानाचे प्रसंगावधान पाहून त्याच्या या कामगिरीला सलाम देखील केला आहे. बीएसएफमध्ये कार्यरत असणारे डॉ. लोकेश्वर खजुरिया असे त्या जवानाचे नाव आहे

अशी घडली घटना

विमानाने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत होता. श्वास घेत असताना त्या व्यक्तीच्या अचानक छातीत दुखायला लागले होते. यावेळी अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर विमानात एकच गोंधळ निर्माण झाला. त्यावेळी बीएसएफ जवानाने पुढाकार घेऊन योग्य ती पावले उचलून सहप्रवाशाची मदत केली.