टीम इंडियासाठी ‘या’ कुटुंबाने चक्क २३ हजार किमी गाडीने केला प्रवास!

हे कुटुंब १८ देश आणि दोन खंडामधून प्रवास करून मँचेस्टरच्या मैदानावर पोहचले

England

मंगळवारी भारत विरूद्ध न्यूझीलंडचा सेमीफायनल सामना खेळला जात होता. पण पावसामुळे हा सामना स्थगित झाला आणि तो राखीव दिवशी खेळणार असल्याचा निर्णय घेतला. यामुळे अनेक चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. मात्र या सर्व चाहत्यांमध्ये हे एक कुटुंब प्रचंड आनंदात होते. कारण हे कुटुंब टीम इंडियाचा सामना पाहण्यासाठी चक्क २३ हजार किमीचा प्रवास गाडीने करून आले होते. सिंगापूरपासून ते मँचेस्टर पर्यंत या कुटुंबाने प्रवास केला.

या कुटुंबाच्या तीन पिढ्या हा सामना पाहण्यासाठी आले होते. या कुटुंबाने १८ देश आणि दोन खंडातून प्रवास केला.  सिंगापूरपासून प्रवास करण्यास या कुटुंबाने सुरुवात केली होती. या क्रिकेटवेड्या कुटुंबाची मुलाखत आयसीसीने घेतली आहे. ही मुलाखत आयसीसीने त्याच्या टि्वटर अकाऊंटवर शेअर केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या कुटुंबावर सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

भारत आणि न्यूझीलंड सामना मंगळवारी पावसामुळे थांबवण्यात आला होता. आज हा सामना पुन्हा सुरु झाला आहे. मंगळवारी न्यूझीलंडने संघाने ४६.१ ऑवरमध्ये २११ धावा केल्या होत्या आणि भारतीय संघाने पाच विकेड घेतल्या होत्या. उर्वरित सामना सध्या चालू झाला आहे. भारतीय संघापुढे २४० धावांचे आव्हान आहे.