पाकिस्तानात ATM मधून चक्क चोरलं सॅनिटायझर; व्हिडीओ होतोय व्हायरल

सरकारकडून मदत न मिळाल्याने पाकच्या लोकांना चक्क सॅनिटायझरची चोरी करावी लागत आहे

Mumbai
corona atm robbery
प्रातिनिधिक छायाचित्र

आख्या जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून देशभरासह राज्याची परिस्थिती देखील दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळावा त्याचा संसर्ग कमी व्हावा यासाठी सरकार, स्थानिक प्रशासनासह माध्यमांकडून सातत्याने ‘आपल्या घरात सुरक्षित रहा, वारंवार हात स्वच्छ धुवा’, असे कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे लोक आपली काळजी घेण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे.

गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क लावणे, वारंवार पाण्याने हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे. मात्र मास्क, सॅनिटायझरचा वापर नागरिकांकडून अधिक होत असल्याने अनेक ठिकाणी त्याचा तुटवडा भासू लागला आहे. भारतासह पाकिस्तानात देखील कोरोनाने शिरकाव केला असून तिकडची परिस्थिती काही वेगळी नाही. पाकमध्ये नुकताच एक प्रकार उघडकीस आला तो म्हणजे सरकारकडून मदत न मिळाल्याने लोकांना चक्क सॅनिटायझरची चोरी करावी लागत आहे.


CoronaVirus: कोरोनासाठी पोलीस बसला घोड्यावर!

कोरोनाव्हायरसच्या भितीने आपले संरक्षण व्हावे म्हणून पाकचे नागरिक खबरदारी म्हणून सॅनिटायझर आणि मास्कची खरेदी मोठ्या प्रमाणात करत आहे. त्यामुळे या गरजेच्या गोष्टींचा साठा संपल्याने एका चोराने चक्क एटीएममध्ये असलेले सॅनिटायझर चोरल्याचा प्रकार उघड झाला आहे. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

असा आहे हा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एटीएमनध्ये पैसे काढण्यास येतो, त्यावेळी तो तिकडे असणारे हँड सॅनिटायझर चोरतो. हा सगळा प्रकार ATM च्या CCTV कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानी पत्रकार नायला इनायतने शेअर केला आहे.