घरट्रेंडिंगVideo: चक्क लग्नात घातले टॉमेटोचे दागिने!

Video: चक्क लग्नात घातले टॉमेटोचे दागिने!

Subscribe

टॉमेटोची किंमत पाकिस्तानमध्ये एवढी वाढली की वधूने चक्क तिच्या लग्नात सोन्याच्या दागिन्या ऐवजी टॉमेटोचे दागिने घातले. पाकिस्तान मधील हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाकिस्तानातील लाहोर येथील ही वधू असून तिने लग्नाच्या दिवशी टॉमेटोचा हार, कानातले आणि बांगड्या घातल्या आहेत. डेली पाकिस्तानच्या रिपोर्टरने त्या नववधूची मुलाखत घेतली असून याचा व्हिडिओ पत्रकार नायला इनायतने ट्विटरवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये नववधू ही सोनरी रंगाच्या पोशाखामध्ये दिसत असून तिने टॉमेटोचे कानातले, बिंदी आणि हार घातला आहे. तिला जेव्हा मुलाखतीत याबद्दल विचारल तेव्हा ती म्हणाली, ‘सोन्याची किंमत खूप जास्त आहे. तसंच टॉमेटो आणि पाइन नट्स देखील महाग आहेत. त्यामुळे मी लग्नासाठी सोन्याच्या ऐवजी टॉमेटोच्या ज्वेलरीचा वापर केला आहे.’ यादरम्याने तिला रिपोर्टरने स्पर्श केला तर ती रागाने म्हणाली, ‘जर हात लावला तर मारेन. टॉमेटो खूप चांगले आहेत.’ तसंच तिने असं देखील सांगितलं की, ‘माझ्या आई वडीलांनी हुंडा म्हणून टॉमेटोचे तीन बॉक्स दिले.’

- Advertisement -

पाकिस्तानची पत्रकार नायला इनायताने हा व्हिडिओ शेअर करताना असं लिहिलं, ‘तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही आयुष्यात सगळं काही पाहिलं आहे तर मग आता ही टॉमेटो ज्वेलरी देखील पाहा.

- Advertisement -

 

पीटीआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये टॉमेटोचे भाव गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानमधील काही भागांमध्ये टॉमेटोचे दर हे ३०० रुपये किलो आहेत.

हा व्हिडिओ २ मिनिटात खूप व्हायरल झाला असून आतापर्यंत ३२ हजार व्हूज आणि २ हजार ५०० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.


हेही वाचा – उत्तराखंड पोलिसांनी भटक्या कुत्र्यांना दिली वेगळी ओळख; व्हिडिओ होतोय व्हायरल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -