दहा फुटाच्या मगरीला ठार मारून झाडाला लटकवलं, मांस गावभर वाटलं

सध्या फोटोंच्या आधारे आरोपींचा शोध सुरू

Odisha

ओडिशामधील एका खेड्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे मलकानगिरी जिल्ह्यातील कलडापल्ली गावात लोकांनी दहा फुटाच्या मगरीला पकडलेच नाही तर तिला ठार मारुन खाल्ले. या संपूर्ण घटनेची फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर प्रशासन आणि वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. आता वनविभागाचे अधिकारी मगर मारून खाणार्‍या लोकांचा शोध घेत आहेत.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, कलडापल्ली गावच्या पोडिया भागाजवळ साबेरी नदी आहे. येथे काही ग्रामस्थांनी दहा फूट उंच मगर पकडली आणि दोरीने बांधून तिला या ग्रामस्थांनी गावात आणले. यानंतर त्या लोकांनी मगरीला धारदार शस्त्राने ठार मारले आणि झाडाच्या खाली टांगले. मगर पकडणारे लोक येथेच थांबले नाहीत. तर त्यांनी पहिले मगरीचे पंजे तोडले आणि नंतर त्याचे अनेक छोटे तुकडे केले आणि ते इतर गावकऱ्यांना वाटले.

मिळालेल्या माहितीनुसार, शिकारींनी मगरीला ठार मारले कारण ती मगर वारंवार गावात प्रवेश करायची आणि त्यांच्या गायी, बकऱ्या जीवंत खायची, असे सांगण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर बर्‍याच वेळा या मगरीने गावकऱ्यांवर हल्लाही केला.

मलकानगिरी जिल्हा वन अधिकारी प्रदीप देबिदास यांनी इंडिया टुडेला सांगितले की, जेव्हा काही ग्रामस्थानी मगरीची शिकार केली आणि ती खाल्ल्याची बातमी समजली तेव्हा आम्ही कर्मचाऱ्यांना कलडापल्ली गावी पाठविले पण त्यांना मगरीच्या शरीराचे अवयव मिळालेले नाहीत. आम्ही अशा तीन लोकांची टीम बनवून मगरींची शिकार करणाऱ्यांचा शोध घेत आहोत. लवकरच आम्ही त्यांना पकडू. सध्या फोटोंच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. मलकानगिरी नक्षलग्रस्त आदिवासी भागात येते. यापूर्वीही अशा घटना याठिकाणी उघडकीस आल्या असल्याचे सांगितले जात आहे.


घर मालकिनीच्या अस्थी पाहून पाळीव कुत्र्याने उंचावरून मारली उडी!