घरट्रेंडिंगपेप्सिकोच्या इंद्रा नुईंचा राजीनामा, ऑक्टोबरमध्ये होणार निवृत्त

पेप्सिकोच्या इंद्रा नुईंचा राजीनामा, ऑक्टोबरमध्ये होणार निवृत्त

Subscribe

पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नुई राजीनामा देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. येत्या ३ ऑक्टोबरपासून इंद्रा आपल्या पदाचा त्याग करणार आहेत. इंद्रा नुई २००६ मध्ये पेप्सिको कंपनीच्या सीईओ म्हणून पदभार स्विकारला होता. इंदिरा यांचा पदभार आता प्रेसिडंट रमोन लगुर्ता यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. लगुर्ता यांनी पेप्सिको कंपनीसोबत गेली २२ वर्ष काम करत आहेत. भारतीय वंशाच्या असलेल्या इंद्रा नूरी या पेप्सिकोच्या पहिल्या महिला सीईओ ठरल्या होत्या. इंद्रा पेप्सिको कंपनीमध्ये सीईओ आणि चेअरमन अशा दोन्ही पदांवर काम पाहत होत्या. २०१९ या वर्षाच्या सुरुवातीला इंद्रा चेअरमनचं पद देखील सोडणार आहेत. पेप्सिको ही खाद्य आणि शीतपेय क्षेत्रातील एक बलाढ्य कंपनी आहे.

कंपनीच्या यशात मोठे योगदान

पेप्सिको कंपनीच्या कोलासारख्या पेयांव्यतिरिक्त इंद्रा यांना कंपनीसाठी अनेक नवीन उत्पादनांची बाजारपेठ विकसीत केली होती. पेप्सिको ब्रँडखाली त्यांनी अनेक नवी उत्पादने लाँच केली. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत पेप्सिकोचे भक्कम स्थान निर्माण व्हायला खूप मोठी मदत झाली. इंद्रा यांचं नाव सातत्याने जगातील टॉप 100 पॉवरफुल महिलांच्या यादीमध्ये राहिलं आहे. फॉर्च्युन कंपनीने त्यांना २०१५ साली जगातील दुसरी पॉवरफुल महिला हा खिताब देत गौरवलं होतं. २००६ मध्ये ज्यावेळी इंद्रा नुई यांची पेप्सिकोच्या सीईओपदी निवड झाली, तेव्हा बोलताना त्या म्हणाल्या होत्या ‘मूळची भारतीय असलेल्या मला परदेशातील एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये उच्चस्थान मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं.’

- Advertisement -

आईची शिकवण मोलाची

इंद्राजींची निवड ‘पेप्सिकोच्या सीइओपदी झाली तेव्हा कार्यालयात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. आदर-सत्कार स्विकारुन जेव्हा त्या घरी पोहचल्या तेव्हा दारात उभ्या असलेल्या आपल्या आईला त्यांनी ही आनंदाची बातमी सांगितली. त्यावर अगदीच थंड प्रतिसाद देत आईनं त्यांना ‘घरात येण्याआधी दुधाची पिशवी आण, असं सांगितलं. वर बजावलं, ‘हे बघ, तू घराबाहेर कितीही मोठं पद, सन्मान मिळव, पण घरात येण्याआधी तो मिरवत असलेला मुकुट खाली गॅरेजमध्येच ठेऊन येत जा. कारण घरात आल्यावर तू फक्त एक मुलगी, एक पत्नी किंवा एक आई असतेस.‘ यावर श्रद्धा म्हणाल्या, ‘आयकॉन बनलेल्या ‘करियर वूमन’सकट एखाद्या बिनचेहऱ्याच्या नोकरदार स्त्रीपर्यंत सगळ्याजणींना हे ऐकावच लागत. आता माझ्यासारख्या काहीजणींना माहेर आणि सासर या दोघांचाही पाठिंबा आणि सन्मानही मिळतो. घरच्यांसाठी सगळ्या गोष्टी करून डोंबिवलीवरून मुंबईत कामाला यायची रोजची तारांबळ खरंच दमछाक करणारी असते. पण घर आणि कार्यालयातही समजून घेणारी माणसं असतील तर या गोष्टी कितीही त्रासदायक असल्या तरीही उत्साहाने केल्या जातात. काम करणं आवश्यक आहे, त्यामुळे नोकरी सोडून घरात बसता येत नाही. त्यामुळे समाजाचा दृष्टिकोन बदलायलाच पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -