घरट्रेंडिंगप्लास्टिकचे पुनर्वापर करुन बनवले पेट्रोल

प्लास्टिकचे पुनर्वापर करुन बनवले पेट्रोल

Subscribe

प्लास्टिकपासून बनवलेले पेट्रोल ४० रुपये प्रतिलीटर या दराने विकत आहेत.

वाढत्या टेक्नोलॉजीसह लोकांचे जीवनही बदलताना दिसत आहे. पर्यावरणाला वाचवण्यासाठी प्लास्टिकचे पुनर्वापर केले जात आहे. प्लास्टिकपासून अनेक प्रकारच्या वस्तू बनवल्या जात आहेत. परंतु हैदराबाद येथील एका प्रोफेसरांनी प्लास्टिकचा पुनर्वापर करून चक्क पेट्रोलच बनवले आहे.

सतीश कुमार असे या प्रोफेसरांचे नाव आहे. सतीश यांनी प्लास्टिकपासून पेट्रोल बनवून अनेक लोकांना आश्चर्यचकीत केले आहे. या प्रक्रियेला ‘प्लास्टिक पायरोलिसीस’ असे नाव दिले आहे. सतीश कुमार यांनी ‘हायड्रोक्सी प्राईव्हेट लिमिटेड’ या नावाची कंपनी स्थापित केली आहे.

- Advertisement -

सतीश कुमार यांनी सांगितले की, प्लास्टिक प्रक्रियेच्या मदतीने प्लास्टिकपासून डिझेल, एव्हिएशन फ्युअल आणि पेट्रोल बनवले जाऊ शकते. जवळपास ५०० किलोग्राम पूर्नवापर करुन ४०० लीटर इंधनाचे उत्पादन केले जाऊ शकते. एवढेच नव्हे तर, ही प्रक्रिया अतिशय सोपी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे यापासून पर्यावरणाला हानी पोहचणार नाही, असेही सतीश कुमार म्हणाले.

- Advertisement -

सतीश कुमार यांनी २०१६ साला पासून आतापर्यंत ५० टन प्लास्टिकचा पेट्रोलमध्ये रुपांतर केले जात आहे. या प्रक्रियेत पुर्नवापरसाठी वापर न होणाऱ्या प्लास्टिकचा उपयोग केला आहे. सतीश यांच्या कंपनीत एका दिवसाला २०० किलो प्लास्टिकपासून २०० लीटर पेट्रोल तयार केले जाते. प्लास्टिकपासून बनवलेले पेट्रोल ४० रुपये प्रतिलीटर या दराने विकत आहेत. या इंधनाचा प्रयोग वाहनात केला जाऊ शकतो. अद्याप प्लास्टिकपासून बनवलेल्या पेट्रोलचा वापर वाहनांसाठी केला जात नाही. सतीश यांनी दिलेल्या माहितीनुसार,  पीव्हीसी (पॉली व्हिनाइल क्लोराइड) आणि पीइटी (पॉली एथेलीन टॅरिफथेलेट) यांना सोडून सर्व प्रकाराच्या प्लास्टिकचा इंधन बनवण्यासाठी वापर केला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -