घरट्रेंडिंगकुत्र्याच्या शौचापासून बांधकामाच्या विटा! अत्यंत स्वस्त पर्याय!

कुत्र्याच्या शौचापासून बांधकामाच्या विटा! अत्यंत स्वस्त पर्याय!

Subscribe

फिलिपाईन्समध्ये शाळकरी विद्यार्थिनींनी कुत्र्याच्या विष्ठेपासून बांधकामाच्या विटा बनवल्या आहेत.

घरबांधणीसाठी लागणारं साहित्य महागलं, की घरांच्या किंमती आपोआप वाढतात. परंतु फिलिपाईन्समध्ये असा एक शोध लावण्यात आला आहे की त्यामुळे घरांच्या किंमती कमी होणार आहेत. घर बांधणीसाठी वापरण्यात येणाऱ्या विटांचा खर्च यामुळे कमी होणार आहे. कुत्र्यांच्या शौचापासून बनवण्यात आलेल्या bio brick बांधकामाच्या अवाढव्य खर्चावर उपाय म्हणून सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे फिलिपाईन्सच्या पायातस जिल्ह्यातल्या एका माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थिनींच्या ग्रुपने या विटा बनवल्या असून त्यामुळे बांधकामाचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार असल्याचा दावा या विद्यार्थिनींनी केला आहे.

या विद्यार्थिनींना देण्यात आलेल्या प्रकल्पासाठी त्यांनी या विटा बनवल्या आहेत. यासाठी त्यांनी कुत्र्यांची पूर्णपणे वाळलेली विष्ठा सिमेंट पावडरसोबत मिसळली आणि त्या मिश्रणाच्या विटा बनवल्या. या विटा बांधकामाच्या इतर विटांपेक्षा जास्त मजबूत आणि कमी खर्चिक असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. राऊटर्सने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

- Advertisement -

रस्ते स्वच्छ राहण्यासाठी मदत

या नव्या प्रयोगामुळे आपले रस्ते अधिक स्वच्छ राहतील आणि बांधकामं अधिक मजबूत होतील, अशी माहिती या विद्यार्थिनींचे शिक्षक मार्क एसबूचे यांनी सांगितलं आहे. स्थानिक सरकार किंवा पालिका या प्रकल्पाला आर्थिक बळ देऊन त्यात अधिक संशोधन करण्यासाठी मदत करेल, अशी आशा देखील मार्क यांना आहे.


Video: चक्क लग्नात घातले टॉमेटोचे दागिने!

भटक्या कुत्र्यांचा योग्य उपयोग

फिलिपाईन्समध्ये कुत्र्यांसंदर्भातले नियम अत्यंत प्राथमिक स्तरावरचे असून त्यांची अंमलबजावणी देखील नीट होत नाही. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या फिलिपाईन्समध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्याचा योग्य उपयोग करून या बायो ब्रिक्स बनवल्याचा दावा विद्यार्थिनींनी केला आहे. या विटा सध्या फुटपाथ किंवा साध्या बांधकामासाठी योग्य असल्याचं सांगण्यात आलं आहे. प्रत्येक विटेसाठी १० ग्रॅम विष्ठा आणि १० ग्रॅम सिमेंट पावडर मिसळण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -