घरट्रेंडिंगमुंबईच्या वडापावला टक्कर देण्यासाठी आलाय गुलाबजाम पाव! व्हिडिओ व्हायरल

मुंबईच्या वडापावला टक्कर देण्यासाठी आलाय गुलाबजाम पाव! व्हिडिओ व्हायरल

Subscribe

महत्त्वाचे म्हणजे गुलाबजाम पावचा फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

मुंबईकरांच्या आवडत्या वडापावला टक्कर देण्यासाठी आता नवा खाद्यपदार्थ आला आहे. त्याचं नाव आहे गुलाबजाम पाव. होय, हे ऐकून आश्चर्याचा धक्का नक्कीच बसेल. पण हे खरं आहे. गुलाबजाम पावचा एक फोटोच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे गुलाबजाम पावचा फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

ट्विटरवर गुलाबजाम पावचा फोटो

कॅटी स्टार्क या ट्विटर अकाऊंट धारकाने गुलाबजामपावचा फोटो शेअर केला आहे. त्याला एक फोटोओळ सुद्धा दिली आहे. त्यानुसार सर्प्राइजसाठी ओपन करा. फोटोमध्ये एका पावात गुलामजाम भरण्यात आला आहे. तसेच त्या गुलाबजामपावच्या बाजूला आपल्याला गुलाबजामने भरलेलं भांडंसुद्धा दिसत आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -