घरट्रेंडिंगजेव्हा पंतप्रधान स्वतः ट्विटला उत्तरे देतात

जेव्हा पंतप्रधान स्वतः ट्विटला उत्तरे देतात

Subscribe

नरेंद्र मोदींना ट्विटरवर टॅग करुन अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या प्रतिक्रियांना आज नरेंद्र मोदींच्या अकाऊंटवरुन उत्तर येताना पाहायला मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी केलेल्या ट्विटला पंतप्रधांनानी उत्तर दिलेले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्विटर अकाऊंटवर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. संसदेत विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर अविश्वास प्रस्ताव दाखल केला पण यावेळी घडलेली राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींची गळाभेट चर्चेचा विषय ठरली आहे. यादरम्यान नरेंद्र मोदींना ट्विटरवर टॅग करुन अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या त्या प्रतिक्रियांना आज नरेंद्र मोदींच्या अकाऊंटवरुन उत्तर येताना पाहायला मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी केलेल्या ट्विटला पंतप्रधांनानी उत्तर दिलेले आहे.

काय आहेत नेमकी ट्विट

- Advertisement -

 

- Advertisement -

 

शुक्रवारी संसदेत झालेली राहुल गांधी आणि मोदींची ऐतहासिक गळाभेट सगळ्यांनाच भावली. दरम्यान राहुल गांधींनी मोदींना मिठी मारताच त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरतेचे भाव पसरलेले दिसले हा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता, त्यावरुन एका नेटकऱ्याने मोदींना ट्विट करत ‘बाकी सगळं उत्तम होतं फक्त चेहऱ्यावर थोडेसे अजून हसू यायला हवे होते असा सल्ला दिला होता’, या ट्विटला उत्तर देताना मोदींनी ‘पॉईंट टेकन’ असे उत्तर दिले आहे.

नेटकऱ्याच्या दुखात मोदी सहभागी

दरम्यान आणखी एका व्यक्तीने मोदीजींना ट्विट करताना असं म्हटले होते की परवा संसदेत भाषण सुरु असताना मी आणि माझे आजोबा ते भाषण पाहत होतो. मात्र त्याच वेळी माझ्या आजोबांचे अचानक निधन झाले त्यामुळे मी पुर्ण भाषण ऐकू शकलो नाही. या ट्विटला उत्तर देताना मोदींनी मी तुमच्या दु:खात सहभागी आहे, अशी प्रतिक्रीया दिलेली आहे.  पंतप्रधानांनी अचानक दिलेल्या प्रतिक्रियेंमुळे त्यांचे फॉलोअर्सही चांगलेच खुश झाले आहेत.

दरम्यान देशातल्या १२५ करोड जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. तो कायम अबाधित ठेवण्यासाठी मी प्रयत्न करेन, असेही मोदी म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -