घरट्रेंडिंग'पोकिमॉन स्लिप'; आता बेडवर झोपणाऱ्या पोकिमॉनला पकडा

‘पोकिमॉन स्लिप’; आता बेडवर झोपणाऱ्या पोकिमॉनला पकडा

Subscribe

'पोकिमॉन गो' नंतर आता पोकिमॉन कंपनीचा 'पोकिमॉन स्लिप' हा गेम लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या गेम संदर्भात चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

पोकिमॉन या कंपनीने आता ‘पोकिमॉन स्लिप’ हा गेम आणला आहे. २०२० साली हा गेम प्रदर्शित होणार आहे. पोकिमॉन कंपनीचा याअगोदरचा ‘पोकिमॉन गो’ गेमने चांगलेच नामलौकीक कमवले होते. हा गेम चाहत्यांना प्रचंड आवडला होता. जगभरातील लोक हा गेम खेळायला लागले होते. या गेमच्या नादात अनेकांनी आपला जीव गमावला होता. त्यामुळे काही देशांमध्ये या गेमवर बंदी घालण्यात आली होती. भारतातही हा गेम चांगलाच गाजला. या गेमने लोकांना पोकिमॉन पकडण्यासाठी प्रचंड धावपळ करायला लावली होती. आता नव्याने येणारा पोकिमॉन गेम लोकांना झोपायला भाग पाडणार आहे. या गेममध्ये पोकिमॉन बेडवर झोपायला जाणार आहे. या झोपायला जाणाऱ्या पोकिमॉनला पकडण्याचे आव्हान असणार आहे.

काय म्हणाले पोकिमॉनचे अध्यक्ष?

पोकिमॉन कंपनीने बुधवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत पोकिमॉन कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनेकाझू इशिहर यांनी सांगितले की, ‘पोकिमॉन गो या गेममध्ये आम्ही लोकांना चालण्यासाठी प्रवृत्त केलं. आता लोकांचा झोपेचा जो वेळ आहे, तो मनोरंजनात्मक करण्याचा आमचा विचार आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात झोपेवर फार मोठा वेळ वाया घालवतो. लोकांची हीच वेळ पोकिमॉनसाठी मोठे आव्हान आहे. लोकांचे ही वेळ मनोरंजनात्मक करण्यासाठी आम्ही हा गेम आणत आहोत.’

- Advertisement -

लोकांची झोप मोडणार पोकिमॉन स्लिप?

लोकांच्या झोपेची वेळ ही पोकिमॉन कंपनीसाठी मोठे आव्हान असल्याचे सुनेकाझू इशिहर म्हणाले आहेत. त्यामुळे पोकिमॉन स्लिप हा गेम लोकांची झोपमोड करणार असल्याचे म्हटले जात आहे.

काय असणार या गेममध्ये?

पोकिमॉन स्लिप या गेम संदर्भात तो कसा असणार याची पुरेशी माहिती समोर आलेली नाही. मात्र बेडवर झोपायला जाणाऱ्या पोकिमॉनला पकडायचे किंवा झोपेतून उठणाऱ्या पोकिमॉनला पकडायचे असले काहीसे आव्हान असणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -