घरट्रेंडिंगरोनाल्डोच्या पासिंगवर पोर्तुगालच्या राष्ट्रध्यक्षांचा ट्रम्पविरोधात गोल

रोनाल्डोच्या पासिंगवर पोर्तुगालच्या राष्ट्रध्यक्षांचा ट्रम्पविरोधात गोल

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रेबेलो दी सॉसा यांच्यात नुकतीच भेट झाली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये फुटबॉलविषयी चर्चा झाली. यावेळी ट्रम्प यांनी रोनाल्डोवर एक जोक केला त्यावर सॉसा यांनी जबरदस्त गोल लगावला.

रशियामध्ये सध्या फुटबॉल वर्ल्डकप सुरू आहे. त्यामुळे जगभरात फुटबॉलचा फिव्हर पहायला मिळत आहे. गल्लीपासून ते अगदी व्हाईट हाऊसपर्यंत सर्वत्र फुटबॉलचीच चर्चा आहे. त्यातही प्रामुख्याने पोर्तुगालचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटु ख्रिस्तियानो रोनाल्डो भाव खाताना दिसतोय. पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रेबेलो दी सॉसा हे नुकतेच अमेरिका दौऱ्यावरुन परतले. सॉसा यांनी अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जाऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये विविध राजकीय चर्चा झाल्या. परंतु सध्या अक्खं जग फुटबॉलमय झाल्याने हे दोन नेतेदेखील फुटबॉलविषयी चर्चा करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. दोन्ही नेत्यांनी बराच वेळ ‘फिफा’वर गप्पा मारल्या. फिफाचा विषय निघाल्यानंतर सॉसा यांना ख्रिस्तियानो रोनाल्डोचाही विषय काढला.

ronaldo
ख्रिस्तियानो रोनाल्डो

‘रोनाल्डोनं पोर्तुगालची निवडणूक लढवली तर…

पोर्तुगालचा संघ हा यंदाच्या फिफाच्या जगज्जेतेपदाचा दावेदार असल्याचे सॉसा यांचे मत होते. त्याला त्यांनी तसे कारणही दिले. ते म्हणाले की, जगातला सर्वोत्तम फुटबॉलपटू पोर्तुगालच्या संघात आहे. याचा त्यांना अभिमान असल्याचेही सॉसा म्हणाले. खेळाची चर्चा सुरू असताना ट्रम्प यांच्यातला राजकारणीदेखील जागा होता. रोनाल्डोची सॉसा खूपच तारीफ करत असल्याचे लक्षात येताच राजकारणी ट्रम्प म्हणाले की, ‘रोनाल्डोने कधी तुमच्याविरुद्ध पोर्तुगालची निवडणूक लढवली तर काय होईल?, ‘रोनाल्डो ती निवडणुक जिंकणार नाही. तो जिंकूच शकत नाही’. यावर ‘अहो, ते पोर्तुगाल आहे, अमेरिका नाही!’ असे म्हणत सॉसा यांनी जबरदस्त गोल लगावला. पुढे सारवासारव करण्यासाठी ट्रम्प म्हणाले की, ‘येस, दॅट्स राइट’.

- Advertisement -

परंतु ट्रम्प आणि सॉसा यांच्या भेटीपेक्षा जास्त चर्चा रोनाल्डोचीच होत आहे. या दोघांच्या चर्चेचे वर्णन फुटबॉलच्या भाषेत करायचे झाल्यास असेच म्हणावे लागेल की, ‘ट्रम्प यांच्याविरोधात रोनाल्डोच्या पासिंगवर सॉसा यांनी लगावला गोल’.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -