घरट्रेंडिंगहातात साप घेऊन मोदींना धमकावणाऱ्या पाकिस्तानी गायिकेचा नग्न व्हिडिओ लिक

हातात साप घेऊन मोदींना धमकावणाऱ्या पाकिस्तानी गायिकेचा नग्न व्हिडिओ लिक

Subscribe

हातात साप घेऊन मोदींना धमकी देणाऱ्या राबी परिजादचा नवा व्हिडिओ व्हायरला झाला आहे.

काश्मीर प्रश्नावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साप आणि मगरींचा हल्ला करु, अशी धमकी देणारी पाकिस्तानी पॉप गायिका राबी परिजाद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी तिची चर्चा भारताशी जोडली गेलेली नसून पाकिस्तानमधील अंतर्गत राजकारणाशी जोडली गेली आहे. खासगी आयुष्यातील फोटो आणि व्हिडिओ ऑनलाईन लिक करण्यात आले आहेत. लिक झाल्यानंतर काही वेळातच ट्विटरवर पाकिस्तानी नेटीझन्स राबीच्या समर्थनार्थ उतरले आहेत. लोकांनी फोटो आणि व्हिडिओ इतरांना पाठवू नयेत, अशी विनंती केली जात आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफुर यांच्याशी वाद झाल्यानंतर राबीचे फोटो आणि व्हिडिओ लिक करण्यात आले, असा आरोपही काही नेटीझन्सनी केला आहे.

ट्विटरवर अनेकांनी राबीच्या व्हिडिओ लिक प्रकरणी गफुर यांना जबाबदार ठरविले आहे. राबीने गफुर यांच्यावर टीका केली होती, त्यानंतर हे व्हिडिओ लिक झाले. तर काही लोकांनी राबीच्या जुन्या प्रियकरावर देखील शंका उपस्थित केली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

राबीचे कालचे ट्विट

दरम्यान राबीने आसिफ गफुर यांच्यावर एका गाण्यासंदर्भात टीका केली होती. पाकिस्तानी लष्कराच्या ‘काफ कंगना’ चित्रपटात नीलम मुनीर या अभिनेत्रीचे एक आयटम साँग आहे. या गाण्यात अश्लिलता आणि भारताबाबत आक्षेपार्ह कडवी होती. गफुर यांनी या गाण्याची वकीली केल्याबद्दल राबीने टीका केली होती.

 

राबीने काही दिवसांपूर्वी तिच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामुळे ती चर्चेत आली होती. या व्हिडिओमध्ये तीने हातात अजगर घेऊन मोदींना धमकी दिली होती. तर समोर टेबलवर मगरी देखील दिसत होत्या. या व्हिडिओनंतर पाकिस्तानच्या वन्यजीव विभागाने राबीला कारणे दाखवा नोटीस दिली होती. यानंतर राबीने हे साप-मगर पाळलेले नसून भाडेतत्त्वार घेतले असल्याचे उत्तर दिले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -