राज ठाकरेंच्या ईडी प्रकरणाबाबत खिल्ली उडवणारे मीम्स व्हायरल

Mumbai
raj thackeray ed case;memes viral on social media
राज ठाकरेंच्या ईडी प्रकरणाबाबत खिल्ली उडवणारे मीम्स व्हायरल

काही दिवसांपूर्वी कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस बजावली होती. २२ ऑगस्ट रोजी त्यांना ईडीच्या चौकशीसाठी मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज ठाकरेंनी ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई होत असल्याचा आरोप मनसेच्यावतीने केले जात आहे. ही सरकारची दडपशाही असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राज ठाकरे यांनी संयम पाळण्याचे आवाहन केल्यानंतर मनसेने २२ ऑगस्ट रोजी पुकारलेला ठाणे बंद मागे घेतला आहे. या प्रकरणावर खिल्ली उडवणारे सोशल मीडियावर अनेक मीम्स तुफान व्हायरल होत आहेत. भाजपाकडून सोशल मीडियावर राज ठाकरेंवर टीका केली जात आहे.

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here