घरट्रेंडिंगपंतप्रधान मोदी बनले 'महात्मा', राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून टोला

पंतप्रधान मोदी बनले ‘महात्मा’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून टोला

Subscribe

राज ठाकरे आपल्या भाषणातून असो किंवा व्यंगचित्रातून, मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत असंच म्हणावं लागेल.

राष्ट्रापिता महात्मा गांधीजींच्या १५० जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन केलं जात आहे. देशातील सर्वसामान्य लोकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सगळेच सोशल मीडियाच्या माध्यमातून गांधींना आदरांजली वाहत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही खास व्यंगचित्राच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. राज ठाकरेंनी काढलेल्या या उपहासात्मक व्यंगचित्रामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एका वेगळ्याच अवतरात दिसत आहेत. या व्यंगचित्रात पंतप्रधान मोदी गांधीजीच्या वेशात चरख्यावर बसून सूत कातताना आपल्याला दिसत आहेत. तर त्यांच्या बाजूला भाजप नेते अमित शाह बसले आहेत.


वाचा: सामर्थ्याचे नाव महात्मा गांधी

शाह आणि मोदी यांच्या आजूबाजूला भाजपने दिलेल्या ‘अच्छे दिन’च्या आश्नासनाचे बॅनर पडलेले दाखवण्यात आहेत. याशिवाय नरेंद्र मोदी कातत असलेल्या सूतावर आर्थिक आणि वैचारिक गोंधळ लिहीलेले दाखवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मोदींच्या पाठीमागे असलेल्या कुटीवर बापूंचा एक फोटो आहे आणि या फोटोतून बापू समोर घडणाऱ्या परिस्थितीकडे आश्चर्याने/ चिंतेने पाहत आहेत. राज ठाकरेंनी मोदींना आजच्या काळातले गांधी दाखवण्याचा मार्मिक प्रयत्न आपल्या व्यंगचित्रातून केला आहे. राज ठाकरे आपल्या भाषणातून असो किंवा व्यंगचित्रातून, मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत असंच म्हणावं लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -