‘वर्ल्डकप कमी आणि हनिमून कप जास्त वाटतो’

भारताच्या पराजयानंतर राखी सावंत बरळली असून सध्या तिचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Mumbai
rakhi sawant
राखी सावंत

विश्वचषक क्रिकेटच्या उपांत्यफेरीत न्यूझीलंडसोबतच्या सामन्यात भारतीय संघाला हार पत्करावी लागली, असे असले तरी भारतीय संघाने चिकाटीने दिलेल्या लढतीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर दुसरीकडे मात्र, आपल्या वक्तव्याने नेहमी वादात राहणाऱ्या राखी सावंतने मात्र, क्रिकेट संघावर टिका केली आहे. ‘ क्रिकेटर आपल्या बायकांना का घेऊन गेले हा वर्ल्डकप कमी आणि हनिमून कप जास्त वाटतो.’ असे सोशल मीडियावरील व्हिडिओत तिने म्हटले आहे.

राखीने लावला सेमी फायनल पराभवाचा शोध

पावसाळ्यात जशा छत्र्या बाहेर येतात. तसंच , मॅच हरल्यानंतर असेच काही तज्ज्ञ बाहेर येतात. राखी सावंत ही त्यापैकीच एक. हा वर्ल्डकप कमी आणि हनिमून कप जास्त वाटतो. क्रिकेटर आपल्या बायकांना का घेऊन गेले ? असा प्रश्न राखीने उपस्थित करत पुन्हा नवा वाद निर्माण केला आहे. वर्ल्डकप हरल्यानंतर राखी सावंतने भारतीय संघावर टीका केली.

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಜುಲೈ 10, 2019

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here