घरट्रेंडिंगरतन टाटांचे २७ वर्षीय मुलाने जिंकले मन; सोबत काम करण्याची दिली संधी

रतन टाटांचे २७ वर्षीय मुलाने जिंकले मन; सोबत काम करण्याची दिली संधी

Subscribe

शंतनूने केलेल्या विशेष कार्याची कहाणी 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' या फेसबुक पेजवर देखील शेअर करण्यात आली आहे. आतापर्यंत २० हजाराहून अधिकांनी या पोस्टला लाईक्स केले असून १.७ हजार युजर्सने याला शेअर केले आहे

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या कर्तृत्वाबदल अनेकांनाच माहित आहे. मात्र २७ वर्षीय तरूण मुलाने अशी काही कामगिरी केली की, त्यामुळे रतन टाटा स्वतः प्रभावित झाले आहे. या २७ वर्षीय मुलाचे नाव शंतनू आहे. शंतनू हा कोणी आयएस, आयएफएस किंवा आयएएस अधिकारी नाही की, त्यांच्या कामगिरीचे कौतुक करावे. मात्र त्याने माणुसकी जपणारे कार्य केल्याने रतन टाटांचे मन जिंकले आहे. शंतनूने केलेल्या विशेष कार्याची कहाणी ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक पेजवर देखील शेअर करण्यात आली आहे. आतापर्यंत २० हजाराहून अधिकांनी या पोस्टला लाईक्स केले असून १.७ हजार युजर्सने याला शेअर केले आहे. या माणुसकीच्या कहाणीमुळे टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे मन तर जिंकलेच मात्र त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी देखील शंतनूला दिली. शंतनूने असे सांगितले की, रतन टाटांसोबत ५ वर्षांपुर्वी भेट झाली होती.

Humans of Bombay ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ನವೆಂಬರ್ 20, 2019

- Advertisement -

‘या’कल्पनेमुळे प्रभावित झाले टाटा

शंतनू ५ वर्षांपुर्वी रस्त्यावर भटक्या कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनेने दुःखी होता. त्यांच्या मृत्यूंची संख्या कमी व्हावी यासाठी शंतनूने रस्ते अपघातात कुत्र्याचा अपघात कमी व्हावा यासाठी कुत्र्यांच्या गळ्यात रिफ्लेक्टर स्वरूपात असणारे कॉलर्स लावले. हे लावल्याने रस्त्यावर वेगात धावणाऱ्या गाड्यांच्या चालकाला लांबूनच हे भटके कुत्रे दिसतील आणि त्यामुळे त्याचा अपघात न होता त्याचा जीवही वाचू शकेल. शंतनूची कल्पना असलेली ही स्टोरी टाटा ग्रुप ऑफ कंपनीच्या ‘न्यूज लेटर’मध्ये प्रसिद्ध झाली होती. शंतनूने आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून रतन टाटांना पत्र देखील लिहिले होते.

- Advertisement -

टाटांनी स्वतः शंतनूला केला फोन 

या पत्राला रतन टाटांनी दोन महिन्यांनंतर उत्तर देत शंतनूला भेटायला बोलावले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुंबई कार्यालयात रतन टाटा यांची भेट घेतली. या बैठकीत टाटांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. ‘मास्टर डिग्री पूर्ण करून मी भारतात परत येताच मला रतन टाटांचा फोन आला. त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये असणाऱ्या प्रचंड कामाचा व्याप सांभाळण्यास मदत करशील का? असे सांगत तू माझा सहाय्यक होशील? का असे देखील फोनवर विचारले.’, असे शंतनूने त्याच्या कहाणीत सांगितले आहे. सुरुवातीला शंतनूला स्वप्नासारखे वाटले आणि शंतनूचा या फोनवर विश्वास बसला नाही. मात्र त्यानंतर ते १८ महिन्यांपासून रतन टाटाच्या ट्रस्टसाठी काम करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -