घरट्रेंडिंगRBI Recruitment: १० वी पास आहात! रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; वाचा सविस्तर

RBI Recruitment: १० वी पास आहात! रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; वाचा सविस्तर

Subscribe

जाणून घ्या, ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) २४१ पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवारदेखील या रिक्त पदासाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२१ असणार आहे. जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छिता त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळ www.rbi.org.in ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत सुरक्षा रक्षकाच्या (security guard) २४१ जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल. सुरक्षा रक्षकाच्या भरती पदांच्या तपशीलात सामान्य वर्गांकरता ११३ पदं, एससी वर्गाकरता ३२ पदं, एसटी वर्गासाठी ३३ पदं, ओबीसी वर्गासाठी ४५ पदं तर ईडबल्यूएस वर्गासाठी १८ जागांकरता अर्ज मागवण्यात येत आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी उत्तीर्ण केलेली असणं आवश्यक आहे. तसेच ज्या उमेदवारांनी पदवी प्राप्त केली आहे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण झाले आहे अशा उमेदवारांना अर्ज करता येणार नाही. यासाठी वयाच्या २५ ते ४५ वर्षांपर्यंत वय असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

- Advertisement -

अशी असणार अर्जाची प्रक्रिया

२२ जानेवारी २०२१ रोजी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रक्रियेत उमेदवारांना १२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर या ऑनलाईन अर्जाची फी जमा करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२१ असणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन परीक्षेचा अंदाजे कालावधी फेब्रुवारी / मार्च २०२१ असा असेल असे सांगण्यात येत आहे. सिक्युरिटी गार्डसाठी २४१ पदांसाठी आरबीआयने काढलेल्या रिक्त जागांखाली निवडलेल्या उमेदवारांचे वेतनमान दरमहा १० हजार ९४० रुपये असणार आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -