घरट्रेंडिंगआयर्नमॅनचा सूट लंडनच्या दुकानात विकायला

आयर्नमॅनचा सूट लंडनच्या दुकानात विकायला

Subscribe

या सूटमध्ये पाच लहान जेट इंजिन बसविली गेली असून ही इंजिन पायलटच्या हातावर आणि मागच्या बाजूस बसवली गेली आहेत.

तुम्हीही कधी आयर्न मॅन होण्याचे स्वप्न पाहिले आहे, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. तुमच्या लाडक्या आयर्न मॅनचा सूट आता लंडनच्या एका दुकानात विकायला आला आहे. ब्रिटनमधील ग्रॅविटी इंडस्ट्रीजने तयार केलेला हा सूट लंडनच्या डिपार्टमेंट स्टोअरमध्ये विकायला ठेवला आहे. या सूटची किंमत तब्बल ३४०,००० पाउंड म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास ३ करोड इतकी आहे.

या आयर्न मॅन सूटमध्ये पायलटच्या हाताला आणि मागच्या बाजूला पाच लहान जेट इंजिन्स बसवली आहेत. त्याचसोबत इलेक्ट्रॉनीक आणि ३ डी प्रिटेंड पार्टही या सूटमध्ये बसवले गेले आहेत. हा सूट जेट इंधन आणि डिझेलवर चालत असून, त्याची स्पिड ३२ किमी प्रति तास इतकी आहे. त्याचसोबत हा सूट १२,००० फूट (३६५८ मीटर) उंचीच्या मर्यादेपर्यंत उडू शकतो. हा सूट चार लिटर पेट्रोलमध्ये तीन ते चार मिनिट उडू शकतो.

- Advertisement -

या सूटची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा सूट खुद्द ऑनस्क्रीन आयर्न मॅन रॉबर्ट डॉनी जुन्यियर या प्रसिद्ध हॉलीवुड स्टारने त्याचा आयर्न मॅन या रोलमध्ये सर्वात पहिला प्रदर्शित झालेला सिनेमा आयर्न मॅनमध्ये घातला होता. यानंतर आलेल्या पुढच्या आयर्न मॅनच्या पार्टसमध्ये त्याचा सूट आणखी बदलत आणि विकसित होत गेला असून आतापर्यंत तब्बल १० पेक्षा जास्त वेगवेगळे आयर्न मॅन सूट आयर्न मॅनच्या चित्रपटातून पहायला मिळाले आहेत.

iron man robert
रॉबर्ट डॉनी जुन्यियर

आयर्न मॅन या चित्रपट हा हॉलीवुडमधील एक हिट चित्रपट असून मारवेल प्रोडक्शनच्या सर्व चित्रपटात सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट म्हणून आयर्न मॅनकडे पाहिले जाते. त्याचप्रमाणे मारवेलच्या इतर सुपरहिरोजपैकी आयर्न मॅन हा सर्वांचा लाडका सुपरहिरो आहे. त्याच्या सोबतच कॅप्टन अमेरिका, थॉर, ब्लॅक पॅंथर या सुपरहिरोजनाही प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -