घरट्रेंडिंग'Free Kashmir' च्या मेहेकचं खरं नाव तेजल प्रभू; डोळ्यात पाणी आणणारी तिची...

‘Free Kashmir’ च्या मेहेकचं खरं नाव तेजल प्रभू; डोळ्यात पाणी आणणारी तिची कहानी

Subscribe

जेएनयू विद्यापीठावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडिया येथे ६ जानेवारी रोजी निदर्शन करण्यात आले होते. या निदर्शनानंतर मेहेक मिर्झा प्रभू हे नाव चांगलंच चर्चेत आलं. गेट वेच्या निदर्शनावेळी मेहेकने Free Kashmir असा मजकूर लिहिलेला बॅनर हातात घेतला होता. त्यानंतर मेहेक चांगलीच वादात अडकली. भाजपने हा मुद्दा लावून धरला असून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. तर सरकारने फ्री काश्मीरचा अर्थ तो नव्हेच… असा सूर लावला आहे. तर पोलिसांनी मेहेकवर भादंवि कलम १५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र मेहेक नक्की कोण आहे? तिचा काश्मीरशी काय संबंध? ती नक्की आहे तर कोण? याबद्दल इंडिया टुडे वेबसाईटने सविस्तर वृत्ताकंन केले आहे. त्याचा हा सारांश…

मेहेक मिर्झा प्रभूचे खरे नाव आहे तेजल प्रभू… ती उत्तमरित्या कथा सादरीकरण करते. युट्यूबवर तिचे बरेच व्हिडिओ आहेत. टेड टॉक्स या लोकप्रिय कार्यक्रमात तिने २०१८ साली स्वतःच्या आयुष्याशी निगडीत काही गोष्टी शेअर केल्या होत्या. तो व्हिडिओ देखील युट्यूबवर चांगलाच प्रसिद्ध आहे. १९८२ साली जन्मलेली मेहेक मुंबईत राहते. झुमरीतलैया नावाचे तिचे कथानक सादरीकरणाची एक ऑनलाईन इन्स्टिट्यूट देखील आहे.

- Advertisement -

मेहेकने त्यादिवशी आपल्या हातात फ्री काश्मीरचे फलक का घेतले? या प्रश्नाकडे जाण्याआधी आपण तिच्या कुटुंबाविषयी जाणून घेऊ. २००१ साली पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना मेहेकने आपल्या आई-वडीलांना गमावलं. एका अपघातात तिचे आई, वडील, भाऊ आणि काका-काकूंचे निधन झाले. हे वृत्त ऐकून दुसऱ्या दिवशी मानसिक धक्का बसल्याने आजोबांचेही निधन झाले. त्या धक्क्यानंतर मेहेक कशीबशी सावरली. वडिलांचा व्यवसाय सांभाळत असताना तिने २००५ साली लग्न केलं. मेहेकला एक मुलगी आहे. २०१३ साली तिने आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला.

बघा मेहेकचे ऑफिशियल युट्यूब चॅनेल

मेहेक मिर्झा नाव कसं पडलं?

मेहेकला गोष्टी सांगायला, लिहायला आवडतात. मध्यंतरी ती नैराश्याच्या आहारी गेली होती. त्यातून बाहेर पडल्यावर ती मेहेक मिर्झा या नावाने कथा लिहायला लागली. मिर्झा गालिब यांचा तिच्यावर प्रभाव असल्यामुळे तिने स्वतःचे मेहेक मिर्झा असे नामकरण केलं. तेव्हापासून ती मेहेक मिर्झा हे नाव लावते.

- Advertisement -

मेहेक आंदोलनात का उतरली?

सामाजिक विषयाबाबत मेहेक पुर्वीपासूनच गंभीर असल्याचं तिने वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांवरुन दिसतं. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि संविधानातील कलम ३७० रद्द करण्याच्या प्रकरणावर ती व्यक्त झालेली आहे. २०१६ साली काश्मीरच्या खोऱ्यात अशांतता पसरल्यानंतर तिने “Kashmir Cries and We Stay Deaf” या विषयाला घेऊन व्यक्त झाली होती.

काहींच्या मते काश्मीरमधील कवी मोहम्मद मुनीम नाझीर सोबत मेहेक अनेक वर्षांपासून काम करत असल्यामुळे तिच्यावर काश्मीरच्या प्रश्नांचा प्रभाव पडलेला आहे. मुनीर मुळेच तिने फ्री काश्मीरचा फलक हाती घेतला होता? असाही आरोप करण्यात आला. मात्र हे आरोप मेहेकने फेटाळून लावले आहेत. माझे काही काश्मीरी मित्र आहेत. पण मुनीरचा आणि गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या निदर्शनाचा काहीही संबंध नसल्याचे तिने स्पष्ट केले.

मेहेकने सांगितलेली तिच्या आयुष्याची कथा – 

मेहेकने सादर केलेल्या काही कथा – 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -