रेडमी नोट-५ प्रो मोबाईलच्या किमतीत कपात

Mumbai
रेडमी नोट-५ प्रो मोबाईल

चीनची मोबाईल कंपनी शाओमीने एमआय-ए २ या आपल्या फोनची किंमत कमी केली होती. त्यानंतर आता कंपनीने आपला सर्वाधिक विकला जाणारा रेडमी नोट-५ प्रो या मोबाईलच्या किमतीत कपात केली आहे. या मोबाईलची किंमत शाओमीने तब्बल ४ हजार रुपयांनी कमी केली आहे.

शाओमी रेडमी नोट 5 प्रोच्या 4 जीबी रॅम असलेल्या मोबाईलची किंमत अगोदर 15 हजार 999 रुपये होती. ती ४ हजार रुपयांनी कमी झाल्यमुळे तो स्मार्ट फोन आता १२ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे. याच मोबाईलच्या 6 जीबी रॅमच्या फोनची किंमत अगोदर 17 हजार 999 रुपये होती . आता हा फोन 13 हजार 999 रुपयांना मिळणार आहे.

शाओमीच्या रेडमी नोट ५ प्रो या प्रकारचे सुमारे एक कोटी फोन जगभरात विकले गेल्याचा दावा कंपीने केला आहे. रेडमी नोट ५ प्रोच्या किंमतीत कपात ही कंपनीला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने करण्यात आली आहे. त्यामुळे चार हजार रुपये कपात केलेला फोन ७ ते ११ जानेवारी यादरम्यानच मिळणार आहे. याची माहिती शाओमीने ट्विटरद्वारे दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here