घरट्रेंडिंग‘रॉयल एनफिल्ड बुलेट ट्रायल्स’ लवकरच होणार लॉंच

‘रॉयल एनफिल्ड बुलेट ट्रायल्स’ लवकरच होणार लॉंच

Subscribe

‘रॉयल एनफिल्ड’ट्रायल्सच्या दोन मॉडेलमध्ये ‘बुलेट ट्रायल्स ३५०’ आणि ‘बुलेट ट्रायल्स ५००’या नावाने बाजारात येणार आहे.

एखादा नावाजलेला ब्रँड वापरणे हे समाजात प्रतिष्ठेचे मानले जाते. पण काही ब्रँड नेहमीसाठीच स्टाइल स्टेटमेंट म्हणून ओळखला जातात. याच नावाजलेल्या ब्रँडमध्ये ‘रॉयल एनफिल्ड’ बाइक्सचे नाव आवर्जुन घेतले जाते. ‘रॉयल एनफिल्ड’त्यांची स्क्रॅम्बलर स्टाइल असणारी बाइक बुलेट ट्रायल्स लॉंच करण्याच्या तयारीत आहे. ‘रॉयल एनफिल्ड’ट्रायल्सच्या दोन मॉडेलमध्ये ‘बुलेट ट्रायल्स ३५०’ आणि ‘बुलेट ट्रायल्स ५००’या नावाने बाजारात येणार आहे. या मॉडेल्सच्या लॉंचिंग आधी कंपनीने बाइकचा टीझर व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. डिसेंबर २०१८ मध्ये रॉयल एनफिल्ड ‘बुलेट ट्रायल’ लॉन्च करण्यात आली होती. या लॉंचिंगनंतर या नव्या बाइकचे काही फोटो ऑनलाइन पहायला मिळाले होते.

- Advertisement -

‘रॉयल एनफिल्ड’ने त्यांच्या या नवीन बाइक्स बद्दल अधिक माहिती उघड केली आहे. तसेच बाइकची किंमत आणि त्या बद्दलची संपूर्ण माहिती बाइक लॉंच दरम्यान देण्यात येणार आहे. नुकताच समोर आलेल्या अहवालानुसार, ट्रायल्स सीरिज बाइक्सची स्टाइलिंग १९५०च्या दशकातील ट्रायल बाइकवर आधारीत आहे. या दोन्ही नव्या मॉडेलमध्ये बुलेट रेंज इंजन तसेच गिअरबॉक्स देण्याची शक्यता आहे.

आधीच्या बुलेटप्रमाणे साम्य

बुलेट ३५०मध्ये ३४६ cc इंजिन, जे १९.८hp पॉवर आणि २८Nm टॉर्क जनरेट करते. तसेच बुलेट ५०० मध्ये ४९९cc इंजिन जे २७.२hp पॉवर आणि ४१.३Nm टॉर्क जनरेट करतो. दोन्ही इंजिनला ५-स्पिड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. इंजिन व्यतिरिक्त नव्या बाइकची टाकी आणि साइड पॅनल जवळपास आधीच्या बुलेट सारखेच दिसत आहेत. तसेच ऑफ-रोड बाइक्समध्ये लांब हॅन्डलबार देण्यात आला आहे.

- Advertisement -

अशी असेल ‘रॉयल एनफिल्ड’ची किंमत

रॉयल एनफिल्डच्या नव्या स्क्रॅम्बलर बाइकच्या किंमतीबाबत कंपनीने कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. पण या बाइकची किंमत क्लासिक रेंजपेक्षा १० हजार रुपये जास्त असण्याची शक्यता आहे. रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० एबीएसची एक्स शोरुम किंमत १ लाख ५३ हजार रुपये आहे तर क्लासिक ५०० एबीएसची किंमत २ लाख ११ हजार रुपये आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -