घरट्रेंडिंगमुंबईत सोशल मीडियावर अफवा आणि जोक्सचा पाऊस

मुंबईत सोशल मीडियावर अफवा आणि जोक्सचा पाऊस

Subscribe

काल रात्रीपासून मुंबई शहरात पावसाने चांगलाच जोर धरलेला आहे. याचा परिणाम आज शहरातील ठिकठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अंधेरीतील गोखले पुलाचा मोठा भाग सकाळी कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा सकाळपासून कोलमडली. मीरा रोड येथील रेल्वे आरक्षण केंद्राला आणि कमला मिल कम्पाऊंडमधील वर्ल्ड ट्रेड इमारतीला लागलेली आग, ट्राफिकचा खोळंबा, सांताक्रूझ येथे बेस्टच्या डबल डेकरला झालेला अपघात आणि ठिकठिकाणी साचलेले यामुळे मुंबईकरांचा आज पावासामुळे चांगला बोजवारा उडालेला आहे. यातच आता व्हॉट्सअॅपवर विविध अफवांचाही पाऊस सुरु असल्याचे दिसत आहे.

दोन आठवड्यापूर्वी चर्नीरोड येथे रस्ता खचल्याचे फोटो आज पुन्हा व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत असून चर्चगेट येथे जमीन खचल्याची अफवा पसरत आहे. तर चर्नीरोड येथील सेट्रंल प्लाझा जवळ लागलेल्या आगीचे व्हिडिओ आज पुन्हा एकदा व्हायरल होत असून चर्नीरोड स्टेशनला आग लागल्याचे सांगितले जात आहे. तसेच सांताक्रूझ येथील शालीमार इमारतीवरील मोबाईल टॉवर जळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून हा व्हिडिओ नक्की कुठला आहे, ते अजून कळलेले नाही.मुंबई पोलीस आणि रेल्वेतर्फे अफवा पसरवू नये, असे वारंवार सागंण्यात येते. मात्र तरीही सोशल मीडियावर अनेकवेळा अजाणतेपणाने असे मेसेजेस व्हायरल होतात. त्यामुळे लोकांनीच अशा प्रकारच्या मेसेजेसना कोणतीही खातरजमा न करता फॉरवर्ड करु नये.

- Advertisement -

एका बाजुला व्हॉट्सअॅपवर अफवा पसरत असतान दुसऱ्या बाजुला मात्र काही मुंबईकर पाऊन आणि त्याच्या समस्येवर मिश्किलपणे विनोद करतानाही दिसत आहेत. व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर सकाळपासूनच अशा जोक्सचा भडीमार सुरु आहे.

- Advertisement -

मुंबईतील अतिवृष्टीमुळे जेव्हा ऑफिसला दांडी मारावी लागते, तेव्हा अनेक कर्मचारी आपल्या विनोदबुद्धीने त्यावर भाष्य करतात. ट्विटरवर असे अनेक गमतीशीर ट्विट पाहायला मिळत आहेत. यापैकीच एकाने असे म्हटलय की, “कंपनीने आता ऑफिसमध्येच राहण्याची सोय करायला हवी. रात्री उशीर घरी जाऊन पुन्हा सकाळी लवकर कामाला निघण्यात काय अर्थ आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -