‘साहो’ चित्रपटावरील ‘हे’ धमाल मीम्स पाहून तुम्हाला हसू होईल अनावर

Mumbai
saaho movie these funny memes viral on social media
'साहो' चित्रपटावरील 'हे' धमाल मीम्स पाहून तुम्हाला हसू होईल अनावर

नुकताचं ‘साहो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री श्रध्दा कपूर यांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट हिंदीसह तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘साहो’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल ६८ कोटी रुपये कमावले आहेत. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट बक्कळ कमाई करत आहे. या चित्रपटामध्ये चंकी पांडे, नील नितीन मुकेश, महेश मांजरेकर आणि मंदिरा बेदी याचा देखील समावेशा आहे.

या दरम्यान सोशल मीडियावर ‘साहो’ची चर्चा सुरू असून या चित्रपटाचे मीन्स तुफान व्हायरल होत आहेत. हे मीन्म पाहून तुम्हाला हसू अनावर होईल. पाहुयात हे व्हायरल झालेले भन्नाट मीम्स.

‘बाहुबली’ या चित्रपटच्या दोन वर्षानंतर प्रभास हा ‘साहो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता ‘बाहुबली’ सारखा पुन्हा एकदा प्रभास प्रेक्षकांची मन जिंकून घेतो की नाही हे येत्या काळात कळेल.