घरट्रेंडिंगओळखलत का या सॅन्टाक्लॉजला?

ओळखलत का या सॅन्टाक्लॉजला?

Subscribe

किक्रेटच्या देव म्हणजेच सचिन तेंडुलकर लहानमुलांसाठी सॅन्टाक्लॉज बनला. सॅन्टाबनून सचिनने लहान मुलांना अनेक गीफ्ट दिली.

क्रिकेटचा देव म्हणजेच सचिन तेंडुलकर याला आपण अनेकदा खेळाच्या मैदानावर बघितले असेल. सचिनने सध्या क्रिकेट पासून निवृत्ती घेतली असली तरीही तो विविध ठिकाणी क्रिकेट खेळताना दिसतो. मागील काही दिवसांपूर्वी रस्त्यावर गाडी थांबवून रस्त्यावर क्रिकेट खेळतांनाचा सचिनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून निवृत्तीनंतर ही क्रिकेटवर सचिनचे प्रेम असल्याचे दिसून आले. मात्र नाताळ सनानिमित्त सचिनने लहान मुलांना चक्क सॅन्टाक्लॉज बनून गीफ्ट दिले आहे. सचिनच्या गीफ्टमुळे लहान मुले खूप आनंदात होती. सचिनने याचा व्हिडिओ बनवून आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओत सचिन लहान मुलांबरोबर क्रिकेट खेळतांना दिसतो आहे. मुलेही या सॅन्टाला गीफ्ट मागत असल्याचे या व्हिडिओत दिसते. सचिनने सॅन्टाबनून शुभेच्छाही दिल्या आहेत.


ओबामाही बनले होते सॅन्टा 

सध्या जगभरात नाताळचे वारे वाहत आहेत. या सणानिमित्त अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी एका रुग्णालयातील लहान रुग्णांना भेट दिली होती. या लहान मुलांना ओबामा यांनी नाताळ सणानिमित्त गीफ्ट दिले. बराक ओबामा हे या रुग्मालायात सांताक्लॉज बनून आले होते. मुलांना अपेक्षा नसतांना चक्क माजी राष्ट्रध्यक्षांकडून गीफ्ट मिळाल्यामुळे या मुलांमध्ये आनंदाचे वातावरण होते. हो हो हो म्हणन बराक ओबामांनी लहान रुग्णांची विचारपूस केली. यावेळी त्यांच्या चांगल्या प्रकृतीबाबत त्यांनी प्रार्थनाही केली.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -