काहीही खेळा पण खेळा; सचिन तेडुंलकरचे आवाहन

फिट इंडिया मोहिमेअंतर्गत सचिनने भारतीयांना खेळा अणि फिट व्हा! असे आवाहन केले आहे. त्यासाठी त्याने किटअप चॅलेंज ही मोहीम सुरू केली आहे.

Mumbai
Sachin tendulkar
सचिन तेंडुलकर (सौजन्य - कॅचन्युज)

सोशल मीडियावर हल्ली वेगवेगळ्या चळवळी, अभियान सुरू आहेत. तसेच ट्विटरवर विविध चॅलेंजसचेही पेव फुटले आहे. नुकतीच ट्विटरवर ‘हम फिट, तो इंडिया फिट’ ही मोहीम खूप गाजली. सेलिब्रिटी, खेळाडू आणि राजकारण्यांपासून ते सामान्यांपर्यंत सर्वांनी या मोहीमेत सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या मोहिमेत सहभाग घेत स्वत:चा फिटनेस व्हिडिओ शेअर केला. याच मोहिमेला जोडून भारतरत्न सचिन तेंडुलकरने नवी मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेद्वारे सचिनने भारतीयांना खेळ खेळण्याचे आवाहन केले आहे. ‘स्पोर्ट्स किट’ घालून तयार व्हा, कोणताही खेळ खेळा आणि फिट व्हा! असे आवाहन सचिनने ट्विटरवरुन केले आहे.

Sachin Tendulkar
सचिन तेंडुलकर

काय आहे चॅलेंज?

सचिनने आज ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्याने भारतीयांना किटअप चॅलेंजमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सचिन या व्हिडिओमध्ये म्हणतो की, ‘लहाणपणापासूनच मला सर्व प्रकारचे खेळ खेळायला आवडत होते. त्यामध्ये प्रामुख्याने मला क्रिकेट खेळायला आवडायचे. तुम्हालाही खेळायला आवडत असेल. फिट इंडिया चॅलेंज हे सर्वांसाठी खुले आहे. त्यामुळे सर्वांनी तयारी करायला घ्या, तुमचे खेळाचे किट परिधान करुन खेळासाठी सज्ज व्हा, खेळणं एंजॉय करा. चांगलं आरोग्य कमवा आणि फिट व्हा!

सचिनने कोणाला दिले चॅलेंज?

सचिनने या व्हिडिओमध्ये बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, महिला क्रिकेटर मिताली राज, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, बॉक्सर विजेंदर सिंग, बॅडमिंटनपटू के. श्रीकांत, हॉकीपटू सरदार सिंग, फूटबॉलपटू संदेश जिंगन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करुन किटअपचॅलेंज साठी नॉमिनेट केले आहे.