घरट्रेंडिंगVideo: 'सचिन तेंडुलकर'सह क्रिकेटवीरांचे रक्षाबंधन

Video: ‘सचिन तेंडुलकर’सह क्रिकेटवीरांचे रक्षाबंधन

Subscribe

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत, विरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली या क्रिकेटवीरांनी रक्षाबंधन साजरे केले. शिवाय देशवासीयांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही दिल्या.

रविवारी सर्वत्र रक्षाबंधनाचा उत्साह पाहयला मिळाला. देशभरातल्या विविध प्रांतातील भावा-बहिणींनी काल मोठ्या उत्साहात रक्षाबंधनाचा सोहळा साजरा केला. मुंबईतही रक्षबंधनाचा आनंद पाहायला मिळाला. विशेषत: मुंबईतील बॉलीवूड सेलिब्रिटीज आणि राजकीय नेते यांनीही रिवावारी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, यानेही रक्षाबंधन साजरे केले. सचिनने बहिण सविता तेंडुलकर यांच्यासोबत अत्यंत साध्या आणि घरगुती पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. दरम्यान सचिनने यावेळेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला. ‘आठवणी कायम सोबत राहतील आणि प्रेमाचं हे नातं अधिक मजबूत होत जाईल. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ताई’ अशी खास कॅप्शन सचिनने हा व्हिडिओ शेअर करताना दिली. सोशल मीडियावर सचिनच्या रक्षाबंधनाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून, फॅन्सकडून आणि क्रिकेटप्रेमींकडून या व्हिडिओचं कौतुक होत आहे. इतका मोठा सेलिब्रिटी असूनही सचिन तेंडुलकरने अत्यंत साध्या पद्धतीने साजरं केलेलं रक्षाबंधन त्याच्या चाहत्यांना भावलं आहे.

व्हिडिओ सौजन्य- ट्वीटर

- Advertisement -

विराट आणि सेहवागचंही रक्षाबंधन

तर दुसरीकडे कर्णधार विराट कोहली आणि फलंदाज विरेंद्र सेहवाग यांनीही रक्षाबंधन साजरे केल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. विरेंद्र सेहवागने रक्षाबंधनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत, ‘माझ्या प्रिय बहिणी अंजू जी आणि मंजू जीसोबत मी गंजू जी’ असं गमतीशीर कॅप्शन दिलं आहे.

सौजन्य- ट्वीटर

- Advertisement -

तर दुसरीकडे टेस्ट सिरीजच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये असलेल्या विराट कोहलीने, रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक जुना फोटो शेअर केला आहे. विराटने त्याचा आणि त्याची मोठी बहिण भावना यांचा लहानपणीचा एक छानसा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून, विराटने आपल्या बहिणीला आणि देशभरातील तमाम भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

सौजन्य- ट्वीटर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -