घरट्रेंडिंगरितेश देशमुखचा माफीनामा..तर संभाजीराजेंचा आक्षेप

रितेश देशमुखचा माफीनामा..तर संभाजीराजेंचा आक्षेप

Subscribe

रितेश देशमुखने रायगडावरील काही फोटो ट्वीटरवर शेअर केले होते. मात्र, या फोटोंमुळे तो चांगलाच ट्रोल झाला होता. दरम्यान हे प्रकरण सध्या चांगलच गाजत आहे.

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या रितेशने नुकतेच ट्वीटरवरुन काही फोटो शेअर केले होते. रायगडावरील शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीत चढून काढलेले काही फोटो रितेशने शेअर केले होते. या फोटोंमध्ये विश्वास पाटील आणि रवी जाधवही आहेत. मात्र, अशाप्रकारे मेघडंबरीत चढणे हा शिवाजी महाराजांचा अपमान असल्याचं म्हणत, लोकांनी रितेशला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं. दरम्यान याप्रकरणी रितेश देशमुखने राज्यातील तमाम शिवप्रेमींची माफी मागितली आहे. रितेशच्या या माफीनाम्यावर शिवाजी महाराज यांचे वंशज आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे.

संभाजी राजांनी नोंदवला आक्षेप

रितेश देशमुखच्या वागणुकीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपला आक्षेप नोंदवला आहे. ‘रायगडावरील सिंहासनाच्या चौथऱ्यावर बसून महाराजांच्या मुर्तीकडे पाठ करुन काढलेले काही सेलिब्रेटिंचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. हे खरोखरच निंदनीय आहे’, असं मत त्यांनी ट्वीटरवरुन व्यक्त केलं आहे. तसंच ‘आज होणाऱ्या रायगड विकास प्राधिकरणाच्या बैठकीत खास नियमावली तयार करण्यात येणार असून त्यातील नियम सर्वांना बंधनकारक असतील,’ असंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

रितेश देशमुखचा माफीनामा

दरम्यान घडल्याप्रकरणी रितेश देशमुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांची माफी मागितली आहे. रितेशने ट्वीटर अकाउंटवरुन त्याच्या माफीनामा जाहीर केला आहे. वाचा, नेमकं काय म्हणाला आहे रितेश…

- Advertisement -


‘सर्वप्रथम आम्ही महारांजाच्या पुतळ्याला हार घालून त्यांना वंदन केलं. त्यानंतर आम्ही तिथे काही फोटो काढून ते  सोशल मीडियावर शेअर केले. यामागे आमची महाराजांविषयीची भक्ती होती. मेघडंबरीत बसून फोटो काढण्यामागे कोणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नव्हता’, अशाप्रकरचं मत रितेशने आपल्या ट्वीटद्वारे व्यक्तं केलं आहे.

या फोटोंवरुन झालेला वाद :

Ritesh deshmukh raigad
सौजन्य- सोशल मीडिया
Ritesh deshmukh raigad
सौजन्य- सोशल मीडिया

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -