घरट्रेंडिंगसंजय राऊतांना शोधताहेत जगभरातील ३५ देश

संजय राऊतांना शोधताहेत जगभरातील ३५ देश

Subscribe

युजर्सने शोधला हरामखोर शब्दाचा अर्थ

जर्मनी, इंडोनेशिया, फ्रान्स, इटली, थायलंड, जपान मलेशिया असो, हॉंगकॉंग असो, मॉरिशस असो, युनाटेड अरब असो, पाकिस्तान असो, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युनायटेड किंगडम, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका ही यादी आणखी वाढतच जाणारी आहे. पण शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नावाचा शोध गुगलवर जगभरातून होतो आहे हे त्यानिमित्ताने समोर आले आहे. एखाद्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटीचा, राजकीय नेत्याचा शोध घ्यावा तसाच काहीसा शोध हा संजय राऊत यांच्या निमित्ताने जगभरातील ऑनलाईन युजर्स घेत आहेत.

Countrie search

- Advertisement -

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत आणि बॉलिवुड अभिनेत्री कंगणा रानौत यांच्यातील शाब्दिक युद्ध थांबण्याचे नाव नाही. त्यातच कंगणा रानौतने मुंबई येताना दिलेल्या ओपन चॅलेंजमुळे आता या वादात भाजपसारख्या राजकीय पक्षांनीही उडी घेतली आहे. पण या वादात दोघांच्याही अपडेटचा शोध घेणारे ऑनलाईन वाचक हे जगाच्या पाठीवर या सगळ्या घडामोडींचा आढावा घेत आहेत. जगभरातील ३५ देशामध्ये संजय राऊत यांचे नाव गुगलवर सर्च केले जात आहे. तर कंगनाच्या वक्तव्यांचा शोध हा जगभरातील १०७ देशांमधून घेण्यात येत आहे हे आता गुगल सर्चमधून समोर आले आहे. पण संजय राऊतांना ऑनलाईन युद्धातही कंगना भारी पडली आहे हे गुगल सर्चच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

Google Trend

संजय राऊत विरूद्ध कंगना गुगल ट्रेंड

आपल्या बेधडक वक्तव्यांबाबत ओळखीचे असणाऱ्या संजय राऊत यांनी कंगनाविरोधात मोर्चा वळवल्याने ३ सप्टेंबरपासूनच सातत्याने जगभरातील नेटकर सध्या या दोघांच्याही वक्तव्यााचा मागोवा घेत आहे. संजय राऊत हे एकीकडे ट्विटरवरून तसेच माध्यमांसमोर येऊन बोलत आहेत. तर दुसरीकडे कंगनाही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून बोलताना तसेच व्हिडिओच्या माध्यमातून आपली भूमिका सातत्याने मांडत आहे. कंगनाने मुंबईत येण्याबद्दलचे केलेले वक्तव्य तसेच संजय राऊत महाराष्ट्र नाहीत हे केलेले वक्तव्य यामुळे दोघेही ऑनलाईन सर्चमध्ये सध्या ट्रेंडिंग आहेत. गेल्या आठवड्याभरापासून कंगना रानौत आणि संजय राऊत यांचा वेबच्या सर्चमध्ये चढता आलेख दिसला आहे.

- Advertisement -

haramkhor

युजर्सने शोधला हरामखोर शब्दाचा अर्थ

संजय राऊत यांनी कंगना रानौतला उद्देशून केलेल्या ट्विटचा शोध घेतानाच ऑनलाईन युजर्सने हरामखोऱ शब्दाचा अर्थही गुगलवर शोधला आहे. त्यासोबतच कंगनाला मिळालेल्या वाय प्लस सिक्युरीटीचाही शोध ऑनलाईन घेण्यात आला आहे. तर काही युजर्सने संजय राऊत यांना पुरविण्यात आलेल्या सुरक्षेचाही शोध ऑनलाईन घेतला असल्याचे गुगल सर्च ट्रेंडमध्ये दिसून येत आहे. नेटकरांनी ऑनलाईन सर्चमध्ये संजय राऊत यांनी कंगनाला उद्देशून काय बोलले आहे हे शोधतानाच ‘हरामखोर लडकी’ असाही शोध ऑनलाईन घेतला आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -