घरट्रेंडिंग'संजू'ला पायरसीचे ग्रहण

‘संजू’ला पायरसीचे ग्रहण

Subscribe

आज प्रदर्शित झालेला संजू हा चित्रपट इंटरनेटवर लीक झाला आहे. सिनेमाची लिंक सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांना रणबीरच्या चाहत्यांनी विरोध केला आहे. चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याचा सिनेमाच्या बॉक्स ऑफीस कलेक्शनवर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

‘मैं बेवडा हूँ, ठरकी हूँ, ड्रग अॅडिक्ट हूँ, सब हूँ, लेकीन टेररीस्ट नहीं हूँ’, असं म्हणत मोठ्या गाजावाजासह बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित ‘संजू’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. संजयचे लाखो चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत होते. त्यासोबतच अनेक चित्रपट समीक्षकांनी चित्रपटातील रणबीर कपूरच्या भूमिकेचे कौतुक केल्यानंतर रणबीर कपूरचे चाहतेही या सिनेमाची वाट पाहत होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिला शो संपण्यापूर्वीच चित्रपट इंटरनेटवर लीक झाला आहे. अनेक नेटीझन्सनी लीक झालेल्या चित्रपटाच्या वेबसाईटची लींक आणि स्कीनशॉट ट्विटर आणि फेसबुकवर शेअर केले आहेत. विशेष बाब म्हणजे चित्रपटाची एचडी प्रिंट लीक झाली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या बॉक्स ऑफीसवरील कमाईवर मोठा परिणाम होणार आहे हे नक्की.

एचडी प्रींटसह टोरंटवरही लीक

याआधीदेखील अनेक बॉलिवूड चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशी लीक झाले आहेत. परंतु चित्रपटांची प्रिंट फार बरी नव्हती. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशीच एचडी प्रिंट लीक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे चित्रपटाची एचडी प्रिंट लोकांच्या हाती लागली किंवा सोशल मीडियावर उपलब्ध झाली, तर लोक हा चित्रपट तिकीट खरेदी करुन पाहणार नाहीत. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांचे धाबे दणाणले आहेत. हा चित्रपट टोरंटवरदेखील अपलोड करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपटाची प्रिंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल.

- Advertisement -

नेटीझन्सनी केला विरोध

ट्विटवरवर ज्या लोकांनी चित्रपटाची लिंक शेअर केली आहे, त्यांना संजय दत्त आणि रणबीरच्या चाहत्यांनी जबरदस्त विरोध केला आहे. तसेच पायरसीचा प्रसार न करण्याचे आवाहनही काही नेटीझन्सनी केले आहे. देशभरातल्या अनेक समीक्षकांनी आणि विश्लेषकांनी संजू पहिल्याच दिवशी ३० कोटी रुपयांहुन अधिक कमाई करेल, असा विश्वास व्यक्त केला होता. चित्रपट लीक झाल्यानंतर मोठी कमाई करतो का? असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

अनेक चित्रपट पायरसीच्या विळख्यात

काही दिवसांपूर्वी सलमान खानचा ‘रेस ३’ हा चित्रपटदेखील ऑनलाइन लीक झाला होता. तसेच सुपरस्टार रजनीकांतचा ‘काला’ आणि शाहीद कपूरचा ‘उडता पंजाब’ हे चित्रपटदेखील पायरसीच्या विळख्यात सापडले होते. उडता पंजाब युट्युबवरदेखील लीक झाला होता. तसेच नवाझुद्दी सिद्दिकी याचा ‘मांझी दी माऊंटन मॅन’ व रितेश देशमुखचा ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ हे दोन चित्रपट तर प्रदर्शनापूर्वीच लीक झाले होते. प्रभासच्या ‘बाहुबली’ या सिनेमाचेदेखील पायरसीमुळे नुकसान झाले होते.

ज्या युजरने संजू लीक केला होता त्याला संबधित वेबसाईटने बॅन केले आहे.

sanju leaked online
संबधित वेबसाईटचा स्क्रीनशॉट
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -