घरट्रेंडिंगपुणेकरांना आवडते हरयाणवी नर्तिका

पुणेकरांना आवडते हरयाणवी नर्तिका

Subscribe

पुणेकर सर्च करतात हरयाणाची अभिनेत्री सपना चौधरीला

कोणतीही गोष्ट शोधायची असल्यास सर्वप्रथम चेहऱ्यासमोर मार्ग दिसतो तो म्हणजे गुगलचा. मग कोणतीही गोष्ट गुगल सहज उपलब्ध करुन देतो. दरवर्षी गुगल एक वार्षिक अहवाल काढतो. या अहवालात जगातील सर्वात जास्त सर्च करण्यात आलेले अभिनेते, अभिनेत्री, गाणी, बातम्या, लोकेशन असा वर्षभरातील ट्रेण्डसचा आढावा घेणारी माहिती जाहिर करण्यात येते. #YearInSearch या हॅशटॅदगसहीत यावर्षी म्हणजे २०१८ मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील कोणत्या व्यक्ती चर्चेत राहिल्या त्या संदर्भातील वेगवेगळ्या विषयांनुसार अव्वल दहा जणांची यादी गुगलने जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये मनोरंजन क्षेत्रातील जगभरात सर्वाधिक सर्च झालेल्या कलाकारांच्या यादीमध्ये भारतातील केवळ एक नाव आहे. हे एक नाव म्हणजे सपना चौधरी. तसेच याहून आश्चर्याची बाब म्हणजे सपना चौधरीबद्दल सर्च करणाऱ्या भारतातील शहरांच्या यादीमध्ये उत्तर भारतीय शहरांबरोबरच पुण्याचे ही नाव पुढे आहे. यावरुन पुणेकरांना हरियाणीतील नर्तिका आवडू लागली आहे.

गुगलमध्ये सपना चौधरी नवव्या क्रमांकावर

गुगलमध्ये सर्च करण्यामध्ये अभिनेत्री सपना चौधरी नवव्या क्रमांकावर आहे. मुळची हरयाणाची असलेली सपना ही लोकप्रिय गायिका, नृत्यांगणा आणि अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. सपना चौधरीचे युट्यूबवर अनेक गाण्यांचे व्हिडिओ भन्नाट लोकप्रिय आहेत. सपना ही बिग बॉस ११ च्या पर्वामधील स्पर्धकही होती. तसेच सपनाने नानू की जानू, भांगओव्हर आणि वीरे दी वेडिंग सारख्या हिंदी चित्रपटांमध्येही तिने आयटम सॉंग्समध्ये काम केले आहे.

- Advertisement -

या विषयांमध्ये सपना झाली अधिक सर्च

गुगलमध्ये सपान चौधरीला अनेक प्रकारे सर्च करण्यात आले आहे. ‘सपना चौधरी गाना डीजे’, ‘सपना चौधरी सॉन्ग डिजे’ आणि सपना चौधरी सॉन्ग २०१८ या गोष्टींने तिला सर्च केले गेले आहे.

पुणेकरांना आवडते सपनाचे व्यक्तीमत्व

सपनाबद्दल सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या अव्वल १५ शहरांची यादीही गुगलने जाहीर केली आहे. विशेष म्हणजे उत्तर भारतामधील अनेक राज्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या सपनाबद्दल सर्च करण्यात पुणेकरही मागे नसल्याचे दिसून येत आहे. सपनाला सर्च करण्यात १५ शहरांमध्ये पुणे शहराचा देखील समावेश आहे. सपनाबद्दल सर्च करण्यात पुणे शहर १४ व्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

ही शहर सपनाला सर्च करतात

भानरोता, इंदौर, कानपूर, थाना शंकर देवरी, सोनपत, पानिपत, लखनौ, भोपाळ, लुधियाना, नवी दिल्ली, रायपूर, सुरत, पुणे आणि अहमदाबाद


वाचा – ‘इअर इन सर्च’मध्ये प्रिया वॉरियर गुगलवर हिट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -