घरट्रेंडिंगसमुद्रात पोहायला जाताय? मग लगेच सावध व्हा, अन्यथा...

समुद्रात पोहायला जाताय? मग लगेच सावध व्हा, अन्यथा…

Subscribe

ही अतिशय गंभीर बाब असून, याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

पावसाळा आला की, अनेकजणं समुद्र परिसरात फिरायला जातात. आजच्या तरुण पिढीला समुद्रात पोहायला अधिक आवडते. परंतु समुद्राच्या पाण्यापासून अनेकांचे मोठे होत असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिका येथे नुकतेच केलेल्या संशोधनात धक्कादायक बाब समोर आली आहे. समुद्रात पोहायला जाणाऱ्या लोकांनी लगेच सावधान झाले पाहिजे, अन्यथा त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

कॅलिफोर्निया विश्वविद्यालयातील मरिसा चॅटमॅन निल्सन यांनी सांगितले की, समुद्रातील पाणी माणसाच्या शरिरासाठी अधिक घातक ठरु शकते. समुद्राच्या पाण्यामुळे चेहऱ्याला किंवा शरिरातील काहीभागाला नुकसान जाणवू शकते. समुद्रात पोहायला जाणाऱ्या लोकांना चेहऱ्याला त्रास जाणवू लागला आहे. समुद्रातील पाण्यामुळे त्वेचा बदलते. यामुळे कानाला आणि चेहऱ्याला नुकसान पोहचण्याची शक्यता वाढू लागली आहे. अमेरिकेन सोसायटी फॉर मायक्रोबायोलॉजी यांच्या वार्षिक सम्मेलनातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. समुद्रातील पाण्यात पोहायला जाणाऱ्यांना श्वास घेताना खूप अडचण होते. एवढेच नव्हे तर, संबधित व्यक्तीच्या कानाला किंवा चेहऱ्याला या पाण्याचा मोठा फटका बसतो.

- Advertisement -

अशाप्रकारे केले संशोधन

या संशोधनासाठी ९ व्यक्तींची निवड करण्यात आली होती. त्यांना १२ तास समुद्राच्या पाण्यात अंघोळ करायला सांगितले. दरम्यान त्यांना सनस्क्रीनचा वापर करण्यास बंदी घातली. एवढेच नव्हे तर, त्यांनी ६ महिन्यापासून कोणत्याही प्रकारच्या अॅन्टिबॅटीक औषधाचे सेवन न केलेल्या व्यक्तींवर रिसर्स करण्यात आले आहे. पाण्यातून बाहेर आल्यानंतर काहीजणांच्या शरिरावर बदल दिसून आला. या संशोधनात ९ पैकी ७ जणांच्या कान आणि चेहऱ्याला समुद्राच्या पाण्याने नुकसान झाल्याचे आढळले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -