६ दिवस ६ वेळा सेक्स; जॅक मा यांचा सुखी वैवाहिक जीवनाचा कानमंत्र

अलिबाबा या वेबसाईटचे संस्थापक आणि यशस्वी व्यावसायिक जॅक मा यांनी नवदाम्पत्यांना सुखी वैवाहिक जीवनाचा नवा कानमंत्र दिला आहे.

World
jack ma 669 formula
सुखी वैवाहिक जीवनाचा जॅक मा यांचा कानमंत्र

यशस्वी व्यावसायिक आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले अलिबाबा डॉट कॉम वेबसाईटचे संस्थापक जॅक मा यांचे एक वक्तव्य सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. याआधी यशस्वी करियरसाठी त्यांनी ९९६ हा फॉर्म्युला दिला होता. म्हणजेच आठवड्यातील सहा दिवस सकाळी ९ ते रात्री ९ कार्यरत राहण्याचा सल्ला जॅक मानी दिला होता. मात्र आता आपल्या नवविवाहित कर्मचाऱ्यांना त्यांनी सुखी वैवाहिक जीवनाचा कानमंत्री दिला आहे. या नव्या फॉर्म्युलाला त्यांनी ६६९ म्हटले आहे. म्हणजे नवविवाहितांनी आठवड्याच्या सहा दिवसांतून सहा वेळा सेक्स करावा.

आलिबाबा कंपनीकडून दरवर्षी कर्मचाऱ्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमात ५४ वर्षीय जॅक मा यांनी सेक्सविषयीचा कानमंत्र आपल्या कर्मचाऱ्यांना दिला. ते म्हणाले की, व्यावसायिक आयुष्यात तुम्ही ९९६ हा फॉर्म्युला वापरा, मात्र खासगी आयुष्यात तुम्ही ६६९ हा फॉर्म्युला वापरला पाहीजे. म्हणजेच नव दाम्पत्यांनी सहा दिवस सहा वेळा सेक्स केला पाहीजे, असे त्यांचे म्हणणे होते.

जॅक मा यांच्या ९९६ या फॉर्म्युलाला तांत्रिक विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मात्र विरोध केला होता. आता त्यांच्या ६६९ या फॉर्म्युलाची देखील खिल्ली उडवली जात आहे. दिवसातून बारा तास काम केल्यानंतर सेक्स करण्याची ताकद राहिल का? असा प्रश्न सोशल मीडियावर एका युजरने विचारला आहे.