शाहीन बागेतील आंदोलनकर्त्या महिलांनी पंतप्रधान मोदींना दिलं व्हॅलेंटाईनचं निमंत्रण

मोदींनी शाहीन बागेत येऊन चर्चा करावी, असं आवाहन आंदोलनकर्त्यांनी केलं आहे.

New Delhi
Modi Valentine Shaheen bagh
पंतप्रधान नरेंद्र मोदींना शाहीन बागेतून निमंत्रण

आज १४ फेब्रुवारी निमित्त देशभरात प्रेमाचा उत्सव साजरा होता आहे. मात्र दिल्लीतील शाहीन बागमधील आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज व्हॅलेंटाईन डे निमित्त निमंत्रण पाठवलं आहे. मोदींनी शाहीन बागेत येऊन व्हॅलेंटाईन डे साजरा करावा, असे आवाहन या आंदोलनकर्त्यांनी मोदींना दिले आहे. गेल्या १५ डिसेंबरपासून शाहीन बागेत नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्या विरोधात आंदोलन सुरू आहे.

शाहीन बाग मधील आंदोलनकर्त्यांनी मोदींना निमंत्रण देण्यासाठी पोस्टरही लावले आहेच. तसेच सोशल मीडियावर Modi #TumkabAaoge हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृपया शाहीन बागेत यावे आणि आमच्याबरोबर प्रेमाचा दिवस साजरा करावा. आमच्याशी बातचीत करावी”, असे आवाहन यानिमित्ताने मोदींना केले आहे.

तसेच पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा किंवा इतर कोणी आले तरी चालेल. मात्र आमच्याशी येऊन सवांद साधावा आणि आम्हाला समजावून सांगावे की जे सर्व देशात सुरू आहे ते संविधानविरोधी नाही. त्यानंतर आम्ही स्वतःच हे आंदोलन थांबवू, असेही कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.